30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्र'आरक्षण मिळालं नाहीतर आई जिजाऊची शपथ सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील'

‘आरक्षण मिळालं नाहीतर आई जिजाऊची शपथ सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील’

मराठा समाज अनेक दिवसांपासून सरकारकडे मराठा आरक्षणाची (maratha reservation) मागणी करत आहे. मात्र सरकार याला फार महत्त्व देत नसल्याचं मनोज जरांगे-पाटील (manoj jarange-patil) यांनी सकाळी माध्यमांशी बोलत असताना सांगितलं आहे. मनोज जरांगे हे २० जानेवारीला सकाळी अंतरवाली सराटीतून मुंबईला निघाले. ते आता मुंबईला येऊन आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. त्यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे वाटचाल केली असताना उपोषणास सुरूवात केली. यावेळी जरांगेंना आणि त्यांच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत. यावेळी जरांगेंचे कुटुंब म्हणजेच मुलगा, मुलगी आणि पत्नी त्यांच्या गळ्यात पडून रडत होते. यावर आता त्यांची मुलगी पल्लवी जरांगेनं पप्पांना (मनोज जरांगे-पाटील) जर काही झालं तर सरकारचं काही खरं नाही असा दावा केला आहे.

गेली काही महिने मनोज जरांगे-पाटील हे सरकारला आरक्षणासाठी विनंती करत आहे. मात्र सरकार केवळ मौन बाळगून आहे. यावर सरकार कोणतंही ठोस पाऊल उचलत नसल्यानं मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीहून मुंबईला आरक्षणासाठी रवाना झाले आहेत. आता मेलो तरीही फरक पडणार नाही. मराठा समाजामध्ये फूट पडू देऊ नका. असं ते माध्यमांशी बोलत होते. मुंबईकडे वाटचाल केल्यानंतर जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे यांनी सरकारवर टीका केली आहे.

हे ही वाचा

मुंबई फेस्टिवल २०२४ ला सुरूवात

‘छाताडात गोळ्या घातल्या तरीही मागे हटणार नाही’

‘२४ ऐवजी २२ तारखेला तपासणीसाठी बोलवा’

काय म्हणाली पल्लवी जरांगे-पाटील?

माध्यमांशी बोलत असताना पल्लवी जरांगे-पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘ज्यानं राज्य घडवलं त्या शिवाजी महाराजांची शपथ घेत आरक्षण देण्याचं खोटं आश्वासन देता. जर पप्पांना काही झालं तर आई जिजाऊची शपथ घेऊन सांगते आणि मराठा समाजाची मुलगी म्हणून सांगते की सरकारचं काय खरं नाही. हे शेवटचं आणि टोकाचं आंदोलन आहे. सरकारने याच महिन्यामध्ये आरक्षण दिलं तर बरं नाहीतर सराकरला वाईट परिणाम भोगावं लागतील’, असं म्हणत पल्लवी जरांगेनं सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी