38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबईमुंबई फेस्टिवल २०२४ ला सुरूवात

मुंबई फेस्टिवल २०२४ ला सुरूवात

मुंबई फेस्टीव्हलसाठी अनेक लोकं वाट पाहू लागली होती. अशातच तो दिवस आज आला आहे. मुंबई फेस्टिव्हल २०२४ (mumbai festival 2024) मध्ये मुंबईचे दर्शन पुन्हा एकदा नव्याने देखाव्यातून तसेच इतर काही बाबींमधून पाहता येणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहेय मुंबईला परदेशी पर्यटक १२ महिने असतात. अशातच आथा मुंबई फेस्टिव्हल सुरू झाल्याने फेस्टिव्हल पाहण्यासाठी अनेक लोकं येऊन या प्रदर्शनाचा अस्वाद घेत असतात. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून मुंबईचे दर्शन मांडण्यात आले आहे. अशातच मुंबई फेस्टिव्हलच्या अंतर्गत महामुंबई एक्स्पोचं (maha mumbai Expo) उद्घाटन वांद्रे – कुर्ला संकुलामध्ये शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

हा फेस्टिव्हल केवळ आठ दिवस राहणार आहे. २० जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत हा फेस्टिव्हल राहणार आहे. अशातच दिपक केसरकर यांनी महा मुंबई एक्स्पोला भेट द्या असं पर्यटकांना आणि मुंबईकरांना आवाहन दिलं आहे. सोमवार ते शुक्रवारी दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत हे फेस्टिव्हल सुरू असणार आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी हे फेस्टिव्हल दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असणार आहे. यावर आता पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?

मुंबई फेस्टिव्हलला आल्याने अनेकांना महाराष्ट्राची संस्कृती आणि समृद्धी वैविध्यपूर्ण कळेल. यासाठी मुंबई फेस्टिव्हलला भेट द्या. फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक महत्त्वाचा विलक्षण अनुभव असणार आहे. देश-विदेशातील नागरिकांनी आवर्जून राज्यातील या स्थळांना भेट द्यावी. यावेळी दिपक केसरकर यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा

‘२४ ऐवजी २२ तारखेला तपासणीसाठी बोलवा’

मुंबई पोलिसांची हजारो पदे रिक्त

‘छाताडात गोळ्या घातल्या तरीही मागे हटणार नाही’

काय म्हणाले गिरीश महाजन?

मुंबई फेस्टिव्हलबाबत राज्यभरामध्ये चर्चा आहे. अशातच आता महा मुंबई एक्स्पोचे उद्घाटन हे दिपक केसरकरांनी केलं आहे. असातच त्यांनी देखील मुंबई फेस्टिव्हलबाबत सांगितलं आहे. मुंबई शहराचे वैशिष्ट्य, शहराचे वैविध्य आणि विविधता दर्शवणारा आहे. यामुळे हा फेस्टिव्हल हा मुंबईकरांसाठी फार महत्त्वाचा असल्याची माहिती आता समोर आली आहे.

फेस्टिव्हलच्या माध्यमातून मुंबईकरांचं स्ट्रिट फुड

भेलपुरी, पाणीपुरी, गोला, कुल्फी यासह मुंबई चौपाटी सारख्या स्टॉलवर मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडचा विविध पदार्थांची लज्जत आणि आस्वाद घ्यायला मिळेल. मुंबई फेस्टिव्हल 2024 मध्ये “टेस्ट ऑफ मुंबई” या नावाने खाद्य पदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी