32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमहाराष्ट्रआझाद मैदानावर मनोज जरांगेंच्या उपोषणाला मान्यता नाही, नवी मुंबईतील 'हे' मैदान उपोषणासाठी...

आझाद मैदानावर मनोज जरांगेंच्या उपोषणाला मान्यता नाही, नवी मुंबईतील ‘हे’ मैदान उपोषणासाठी सुचवलं

राज्यामध्ये अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यांनी सरकारला आरक्षणाची मागणी केली आहे. मात्र सरकारने आरक्षण देण्याबाबत अजूनही कोणतंही पाऊल उचललं नाही. सरकार केवळ काही दिवसांपासून आश्वासन देत आहेत. यामुळे मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कुच केली आहे. लाखोंच्या नाहीतर कोटींच्या संख्येनं मराठा बांधव मनोज जरांगेंसोबत चालत मुंबईकडे येत आहेत. सध्या ते लोणावळ्यामध्ये आहेत. ते मुंबईच्या आझाद मैदानावर २६ जानेवारी दिवशी येणार आहेत. मात्र आशातच एक नवीन अपडेट समोर येत आहे. जरांगे यांना आझाद मैदानावर उपोषण करता येणार नाही, त्यांची व्यवस्था नवी मुंबईतील खारघरमध्ये केली आहे.

अनेक दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील हे मुंबईला कुच करणार असल्याचं बोललं गेलं. ते सत्यातही उतरलं असून सध्या लोणावळ्यामध्ये आहेत. त्यांना मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी जागा निवडली होती तसेच काही दिवसांपासून आझाद मैदानाची परवानगी काढण्यात आली. मात्र आता जरांगे यांना आणि मराठा बांधवांना उपोषणासाठी आझाद मैदान देण्यात येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिस म्हणाले की, आझाद मैदानावर क्षमता नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर खारघर नवी मुंबईतील सेक्टर २९ येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन मैदान उपोषणासाठी दिलं आहे.

हे ही वाचा

पार्थ पवार कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी, राजकीय हालचालींना वेग

‘मीरा रोडवर फिरवलेला बुलडोजर म्हणजे राजकारण’

नाशिकमध्ये दोन दिवसात एक लाख घरांचे सर्वेक्षण

जरांगे-पाटील यांना कोर्टाकडून नोटीस

मनोज जरांगे-पाटील हे २६ जानेवारी दिवशी मुंबईमध्ये येणार आहेत. मात्र त्यांना आणि मराठा बांधवांना मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करून दिलं जाणार नसल्याचं कोर्टाकडून जरांगे-पाटील यांना नोटीस दिली आहे. मराठा आंदोनामुळे मुंबईची दैनंदिन वाहतुक कोलमडेल आणि त्यावर त्याचा परिणाम होईल, असं पोलिसांनी नोटीशीमध्ये लिहिलं आहे. मुंबईमध्ये असं एकही मैदान नाही की ज्यामुळे सर्व मराठा आंदोलकांना मैदानात जागा पुरेल.

उच्च न्यालयाच्या आदेशानुसार केवळ ५ ते ६ हजार आंदोलकांची संख्या असलेल्या मैदानात आंदोलन करता येईल. मात्र पर्याप्त जागा नसल्यानं त्या आंदोलकांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही. तसेच ७ हजार स्क्वेअर मीटर क्षेत्र आंदोनासाठी वापरता येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी