29 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeमुंबईमुंबई एअरपोर्टवर तब्बल ६०० रुपयांचा डोसा

मुंबई एअरपोर्टवर तब्बल ६०० रुपयांचा डोसा

एअरपोर्टवर आपण गेला असाल तर आपल्याला खाण्याच्या वस्तूंच्या किंमती दरामध्ये वाढ होताना दिसते. खाण्याच्या किंमती दरामध्ये वाढ जरी होत असली तरी त्याला एक मर्यादा असते. अनेकदा एअरपोर्टवर काही खरेदी करायचे म्हंटले तर दहा वेळा विचार करावा लागतो. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर (Chatrapati Shivaji maharaj International Airport) असंच काहीसं घडलं आहे. ते ऐकून खवय्यांना आणि सामन्यांना धक्का बसू शकतो. आतापर्यंत आपण डोस्याची किंमत १०० तसेच २०० रुपयांपर्यंत ऐकली असावी मात्र आता तब्बल ६०० रुपयांचा डोसा (600 Rupees Dosa) एअरपोर्टवर विकला जात आहे. नक्की डोसा विकत आहे की सोनं? असा सवाल आता नेटीझन्स करताना दिसत आहेत. (Mumbai Airport)

६०० रुपयांमध्ये दोन ते तीन माणसांचं पोटभर जेवण होतं. मात्र एका डोस्यासाठी एवढे रुपये खर्च करणे म्हणजे महामूर्खपणाचं लक्षण आहे. आता ६०० रुपयांचा एवढा महाग डोसा खाल्ला तर चवीमध्ये फरक जाणवू लागेल. मात्र असं काही नाही ४० ते ५० रुपयांच्या डोस्याची चव या डोस्याला असते. एक साधी पिवळी बटाट्याची भाजी डोस्यामध्ये घालून बनवली जाते. डोस्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटीझन्स प्रतिक्रिया देत आहेत.

हे ही वाचा

के.एल. राहुलचं संयमी शतक

डॉ. अमोल कोल्हे यांनी अजितदादांना पुन्हा झोडपले

स्मृती मानधनाला हवा आहे ‘असा’ मुलगा; बीग बी अमिताभ बच्चनसमोर दिली स्पष्टोक्ती

काय म्हणाले नेटकरी?

६०० रुपयांच्या डोस्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तर कुणी मिश्किल टिप्पणी केली आहे. १ कोटीहून अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. याची देशभर चर्चा आहे. यावर काहींनी डोसा हा श्रीमंत लोकांसाठी विकला जात असल्याची प्रतिक्रिया दिली. हा डोसा गॅसवर नाहीतर पेट्रोलवर तयार केला आहे. ६०० रुपयांमध्ये किमान ५० डोसे मिळतील तसेच एका नेटीझन्सने डोस्याच्या किंमतीची तुलना चांदीच्या किंमतीशी केली आहे. अशा मिश्किल प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Chefdonindia या इंस्टाग्राम पेजवरून मुंबई एअरपोर्टवर मिळणाऱ्या डोस्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  यासोबतच फिल्टर कॉफी घ्याल तर २० रुपये अधिक द्यावे लागतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी