29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्रिकेटके.एल. राहुलचं संयमी शतक

के.एल. राहुलचं संयमी शतक

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया असा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेमध्ये पाहायला मिळत आहे. टीम इंडियाला म्हणावी अशी चमकदार कामगिरी करता आली नाही. पहिल्या दिवशी केवळ ८ बाद १९१ धावा झाल्या होत्या. सर्वच होत्याचं नव्हतं होऊन बसलं होतं. यावेळी मधल्या फळीत फलंदाजीसाठी येणारा फलंदाज म्हणजे के. एल राहुल आहे. त्याने अगदी संयमी खेळी करत संघाचा पहिला डाव सावरला आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी म्हणावी अशी कामगिरी केली नाही. सर्वच गडी स्वस्तात मस्त तंबूत परतले. पहिल्या दिवशी ८ फलंदाज बाद होऊनही के. एल राहुलने चांगली कामगिरी केली. तर मोहम्मद सिराजने केवळ २२ चेंडूमध्ये ५ धावा केल्या. असं असताना के.एल. राहुलने संयमी खेळाचं प्रदर्शन करत शतक पूर्ण केलं आहे.

पहिल्या दिवशी टीम इंडियाचा खेळ संपला होता तेव्हा संघाच्या केवळ १९१ धावा झाल्या होत्या. यावेळी के. एल. राहुलच्या ७० धावा झाल्या होत्या. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच (२७ डिसेंबर) के. एल.राहुलने आपला संयमी खेळ दाखवून शतक केलं आहे. सिराजच्याजागी पहिलाच कसोटी सामना खेळणारा प्रसिद्ध कृष्णा आला. त्याने ८ चेंडू खेळले असून विकेट गमावली नाही. ६६ व्या ओव्हरमध्ये गोराल्डच्या गोलंदाजीवर के.एल. राहुलने षटकार मारत शतक पूर्ण केलं असून इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन मैदानावर शतक करणारा पहिलाच विदेशी फलंदाज ठरला असल्याचा एक नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे.

हे ही वाचा

डॉ. अमोल कोल्हे यांनी अजितदादांना पुन्हा झोडपले

स्मृती मानधनाला हवा आहे ‘असा’ मुलगा; बीग बी अमिताभ बच्चनसमोर दिली स्पष्टोक्ती

शिखर धवनमधील बाप तळमळला

दरम्यान २०२१-२२ या वर्षात के. एल.राहुलने २६० चेंडूत १२३ धावांची अफलातून कामगिरी करत फलंदाजी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या याच मैदानावर त्याचे दुसरे शतक आहे. तर कसोटी करियरमध्ये ८ वे शतक असल्याची माहिती समोर आली आहे. चौकार आणि षटकार पाहता त्याने ४ षटकार आणि १४ चौकार मारत त्याने १३७ चेंडूत १०१ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने ३१ धावा, विराट कोहलीने ३८ धावा, शार्दुल ठाकूरने २४ धावांचे मोजकेच योगदान दिलं आहे. कसोटी सामना सुरू होण्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने के.एल.राहुलबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं आहे.

काय म्हणाला होता रोहित?

कसोटी सामना सुरू होण्याआधी रोहित शर्माने पत्रकार परिषदेमध्ये के. एल.राहुलचं कौतुक केलं होतं. तो म्हणाला की, के. एल. राहुलने विश्वचषकामध्ये चांगली कामगिरी केली होती. तो मधल्या फळीचा फलंदाज असल्याने तो त्या परिस्थितीमध्ये योग्य खेळी खेळतो. हेच भाकीत आता के. एल. राहुलने खरं केलं आहे, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी