33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रCOW HUG DAY : मोदी होली काऊ अदानीला हग करून बसलेत, आम्ही...

COW HUG DAY : मोदी होली काऊ अदानीला हग करून बसलेत, आम्ही कशी मिठी मारणार?

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभर ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. प्रेमी यगुलांसाठी हा दिवस म्हणजे एक पर्वणीच असते. पण या दिवशी ‘गोमाता आलिंगन दिन’ साजरा कार्याचे आवाहन केंद्र सरकारच्या प्राणिसंवर्धन मंडळाकडून करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या आवाहनाचा सर्वच स्तरांतून विशेषकरून विरोधकांकडून खिल्ली उडविण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीदेखील या प्रस्तावावर आपल्या खोचक शैलीत टीका केली आहे. गुरुवारी प्रसारमाध्यमांनी याबाबत संजय राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यातील मधुर संबंधाचा दाखल दिला आहे. ते म्हणाले, “नरेंद्र मोदींची ‘होली काऊ’ म्हणजे अदानी. आम्ही अदानींना ‘होली काऊ’ म्हणतो. आता नरेंद्र मोदी एवढ्या मोठ्या होली काऊला ‘हग’ करून बसले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना ‘हग’ करता येत नाही.” (Modi Hugs Holi Cow Adani, How Can We Hug?)

#COW HUG DAY : मोदी होली काऊ अदानीला हग करून बसलेत, आम्ही कशी मिठी मारणार?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या ‘COW HUG DAY’ बाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले,”आमची याकडे बघण्याची इच्छाच नाही आहे. कारण त्यांची ‘होली काऊ’ म्हणजे अदानी. मोदी अदानींना ‘हग’ करून बसले आहेत. त्याला आम्ही ‘होली काऊ’ असे म्हणतो. एवढ्या मोठ्या गायीला त्यांनी आलिंगन दिल्यामुळे दुसऱ्या गायींचं या देशात काय राहिलंय? आम्हाला अदानीला ‘हग’ करता येत नाही, म्हणून आमच्यासाठी त्यांनी गायी सोडल्या आहेत. पण गाय गोमाता आहे, तिचा आम्ही आदर करतो”.

केंद्र सरकारच्या या धोरणावर आता नेटिझन्सनी तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या मुद्द्यावरून सरकारवर उपरोधिक भाष्य केले आहे. आव्हाड यांनी ट्विट करत सरकारच्या या आदेशावर टीका केली आहे. ते म्हणाले,”१४ फेब्रुवारी जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. आणि भरतात १४ फेब्रुवारी ‘आता गाईला मिठी मारा’, असा साजरा करण्याचे आदेश निघाले आहेत.

हे सुद्धा वाचा

१४ फेब्रुवारी ‘गाय आलिंगन दिन’ हा वादग्रस्त विषय?

राजभैय्या..! तुमच्या मित्राचं सरकार आलं आहे, अजान बंद कधी करणार? तोगडियांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला महाराष्ट्र अर्थसंकल्प ९ मार्चला…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी