30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरातील कणेरी मठात 50 गाईंचा मृत्यू, 30 गायी गंभीर; शिळ्या अंन्नातून विषबाधा

कोल्हापुरातील कणेरी मठात 50 गाईंचा मृत्यू, 30 गायी गंभीर; शिळ्या अंन्नातून विषबाधा

कोल्हापुरातील कणेरी मठात (Kolhapur Kaneri cloister) पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे. येथे जनावरांचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले आहे. हा कार्यक्रम सुरु असतानाच मठातील गोशाळेतील गाईंना शिळ्या अन्नातून विषबाधा (food Poisoning) होऊन 50 ते 54 गायींचा मृत्यू (cows die) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तसेच 30 गाईंची प्रकृती गंभीर (critically ill) असल्याचे देखील वृत्त समोर आले आहे. दरम्यान गाईंच्या मृत्यूंमुळे पंचमहाभूत लोकोत्सवाला गालबोट लागले आहे. ( Kolhapur Kaneri cloister 50 cows die, 30 critically ill Poisoning from stale food)

कोल्हापुरातील कणेरी येथील काडसिद्धेश्वर स्वामींच्या मठातील या घटनेनंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्याचे पथक गाईंवर उपचार करत असून मृत गाईंचे शवविच्छेदन करुन गाईंच्या मृत्यूचे कारण तपासले जाणार आहे. या महोत्सवातील शिल्लक राहिलेले अन्न या गाईंना खाऊ घालण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या शिळ्या अन्नामुळे गाईंना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. कणेरी मठात सुरु असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली होती.

हे सुद्धा वाचा

नवाब मलिक आजारीच, मुंबई उच्च न्यायालयाने केले मान्य

अरेच्च्या : २४ तासांसाठी भिकारी बनला ‘हा’ प्रसिद्ध युट्यूबर

संजय राऊत-आगलावे ; काय डोंगूरफेम शहाजी बापू पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल

पर्यावरण संवर्धनाच्या जनजागृतीसाठी कोल्हापुरातील कणेरी मठ येथे सुरू असलेल्या या पंचमहाभूत लोकोत्सवासाठी लाखो कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले होते. पर्यावरण जनजागृतीसाठी या महोत्सवाचे आयोदजन करण्यात आले होते. या महोत्सवात येणाऱ्यांसाठी मोठ्याप्रमाणात भोजनाची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. मात्र शिल्लक राहिलेले अन्न गोशाळेतील गाईंना खाऊ घातल्याने या गाईंना विषबाधा होऊन 50 हून अधिक गाईंचा मृत्यू झाला, तसेच जवळपास 30 गाईंची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी