29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रठाण्यात खा.हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

ठाण्यात खा.हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

नाशिकच्या जागा घेण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ आहे. उमेदवारीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असले, तरी विद्यमान खासदार हेमंत गोडसे आपले आव्हान कायम ठेवून आहेत. गोडसे हे रविवारी (दि. १४) पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यात गेले होते. याठिकाणी त्यांनी तिकिटासाठी आग्रही भूमिका घेतल्याची चर्चा आहे. खासदार गोडसे यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर असली, तरी दोघांविषयी नाराजी असल्याने महायुतीत तिसऱ्या पर्यायाचा शोध घेतला जात असल्याचे समजते . जिल्हाप्रमुख आजय बोरस्ते दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ठाण्यात गेल्याचे समजताच हेमंत गोडसे यांनीही कल्याण गाठत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती.

नाशिकच्या जागा घेण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ आहे. उमेदवारीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असले, तरी विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse ) आपले आव्हान कायम ठेवून आहेत. गोडसे हे रविवारी (दि. १४) पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी (meet CHIEF Minister) ठाण्यात (Thane) गेले होते. याठिकाणी त्यांनी तिकिटासाठी आग्रही भूमिका घेतल्याची चर्चा आहे. खासदार गोडसे यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर असली, तरी दोघांविषयी नाराजी असल्याने महायुतीत तिसऱ्या पर्यायाचा शोध घेतला जात असल्याचे समजते . जिल्हाप्रमुख आजय बोरस्ते दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ठाण्यात गेल्याचे समजताच हेमंत गोडसे यांनीही कल्याण गाठत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. (Hemant Godse to meet CM in Thane)

मात्र, या भेटीत त्यांना अपेक्षित आश्वासन मिळाले नसल्याने, त्यांनी रविवारी ठाणे गाठत मुख्यमंत्र्यांच्या शुभ-दीप निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यात नेमकी काय चर्च झाली हे मात्र समजू शकले नाही. सेनेतून बोरस्ते, करंजकर, चौधरी यांची नावे पुढे आल्यापासून हेमंत गोडसे यांची धाकधूक वाढली असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, नाशिकच्या जागेचा तिढा लवकरात लवकर सुटावा यासाठी महायुतीत सध्या बैठकांचा जोर आहे. दरम्यान, गोडसे यांच्या भेटीनंतर महायुतीत पुन्हा नाशिकच्या जागेवरून चर्चा होण्याची शक्यता आहे. अशात नाशिकच्या जागेवरून महायुतीत एकमत होणार काय? याची उत्सुकता नाशिक सह उत्तर महाराष्ट्राला लागली आहे.

उत्तर महाराष्ट्रात केवळ नाशिकची एकच जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. दोन टर्म निवडून आलेले खासदार त्या ठिकाणी पुन्हा इच्छुक असणार आणि उमेदवारी मिळणे स्वाभाविक आहे. ते जोरदार प्रयत्न देखील करत आहेत. उमेदवार कोण आहे, हे महत्त्वाचे नाही, तर धनुष्यबाण चिन्ह महत्त्वाचे आहे.
– भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख, उत्तर महाराष्ट्र

शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची नावे समोर आली आहे. राष्ट्र वादीकडून भुजबळांचे नाव चर्चेत आहेत. तर भाजपा देखील नशिक् साठी आजही आग्रही आहे. तिकिटासाठी महा युती मध्ये स्पर्धा वाढली आहे.शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची नावे समोर आली आहे. राष्ट्र वादीकडून भुजबळांचे नाव चर्चेत आहेत. तर भाजपा देखील नशिक् साठी आजही आग्रही आहे. तिकिटासाठी महा युती मध्ये स्पर्धा वाढली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी