38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeक्राईमराजीवनगर येथे लग्नाच्या खरेदीला गेले अन् चोरट्यांनी लॅचलॉक तोडून दागिने लांबविले

राजीवनगर येथे लग्नाच्या खरेदीला गेले अन् चोरट्यांनी लॅचलॉक तोडून दागिने लांबविले

परिसरातील राजीवनगर कुलूपबंद सदनिकेत प्रवेश करून सुमारे ८४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. फिर्यादी शुभम महेंद्र पगारे (२७, रा. सागर अपार्टमेंट, अश्वमेध कॉलनी) हे शनिवारी (दि.१३) कुटुंबीयांसह खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. यावेळी अज्ञात चोरांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करत दागिने लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अज्ञात चोरांनी भरदिवसा लग्नघरी आले आणि घरातील दीड ग्रॅम सोन्याच्या वाट्या, १८ ग्रॅमचे मंगळसूत्र, अडीच ग्रॅमची अंगठी, अर्धा ग्रॅमचे सोन्याचे मणी, अडीच ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, सोन्याची लटकन, ३८ ग्रॅमचे चांदीचे पैंजण, १२ ग्रॅमचे जोडवे असा ८४ हजार ७०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरांनी पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

परिसरातील राजीवनगर कुलूपबंद सदनिकेत प्रवेश करून सुमारे ८४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने ( Jewellery) लंपास केल्याची घटना घडली. फिर्यादी शुभम महेंद्र पगारे (२७, रा. सागर अपार्टमेंट, अश्वमेध कॉलनी) हे शनिवारी (दि.१३) कुटुंबीयांसह खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. यावेळी अज्ञात चोरांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करत दागिने लांबविल्याचे (Thieves stole jewellery ) फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अज्ञात चोरांनी भरदिवसा लग्नघरी आले आणि घरातील दीड ग्रॅम सोन्याच्या वाट्या, १८ ग्रॅमचे मंगळसूत्र, अडीच ग्रॅमची अंगठी, अर्धा ग्रॅमचे सोन्याचे मणी, अडीच ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, सोन्याची लटकन, ३८ ग्रॅमचे चांदीचे पैंजण, १२ ग्रॅमचे जोडवे असा ८४ हजार ७०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरांनी पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
( Went shopping for a wedding in Rajivnagar and the thieves broke the latchlock and stole the jewellery)

लग्नाच्या घरी चोरीचे विघ्न आल्याने परिसरात नाराजी व्यक्त होत आहे.राजीवनगर हद्दीत असलेल्या अश्वमेध कॉलनी परिसरातील सागर अपार्टमेंटमधील नव्या क्रमांकाच्या सदनिकेत शुभम पगारे हे कुटुंबीयांसह वास्तव्यास लग्न असल्यामुळे ते शनिवारी सकाळी मुंबई येथे लग्नाच्या खरेदीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या सदनिकेचा मुख्य दरवाजा व्यवस्थितपणे लॅचलॉक लावून बंद केला होता. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पगारे यांना त्यांच्या घरासमोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या बिडवई यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा व लॅचलॉक तुटलेले दिसत आहे. दरवाजाही उघडा आहे, त्यानंतर ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नाशिकला राहत्या घरी पोहोचले. यावेळी चोरांनी हे लॉक कशाच्या तरी साहाय्याने तोडून घरात प्रवेश करत चोरी केल्याचे निदर्शनास आले.

परिसरातील नागरिक चिंतेत
परिसरात एवढी दाट वस्ती असताना, चहूबाजूने नागरिक राहत असताना चोरटे एवढी मोठी हिंमत कशी करु शकतात? त्यांना पोलिसांचं भय वाटत नाही का? असे प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात चर्चा सुरु झालीय.

पोलिसांचा तपास सुरु
भर वस्ती असताना चोरटे कसे आले, ते कुठून आले. परिसरात कुठे सीसीटीव्ही आहेत का, त्यामध्ये चोरटे कैद झाले आहेत का? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. ते लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळतील, अशी आशा नागरिक यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी