34 C
Mumbai
Sunday, June 2, 2024
Homeमहाराष्ट्रहे आहेत ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे दिवस आणि सण

हे आहेत ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे दिवस आणि सण

ज्युलियन आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ऑक्टोबर हा वर्षाचा दहावा महिना आहे. ऑक्टोबर महिना उपवास आणि सणांच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. या महिन्यात श्राद्ध पक्ष, घटस्थापना,शारदीय नवरात्री, दसरा, सर्व पितृ अमावस्या आणि कोजागरी पौर्णिमा साजरी होईल. ऑक्टोबरच्या सण उत्सवाची संपूर्ण यादी आपण जाणून घेऊया.

महत्वाचे दिवस आणि सण

२ ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती,लाल बहादूर शास्त्री जयंती
१५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर- नवरात्री
२४ ऑक्टोबर – दसरा
३१ ऑक्टोबर – सरदार वल्लभभाई पटेल जयंती

महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती

२ ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका मांडणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांच्या आठवणीसाठी राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या सांस्कृतीक आणि देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. महात्मा गांधी यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. २ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. तर २०१४ साली गांधी जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनला सुरुवात केली. त्याचा दुसरा टप्पा गांधी जयंती २०२१ रोजी सुरू झाला.

मोहनदास करमचंद गांधी हे एक भारतीय वकील, राजकीय नीतितज्ञ होते. गुजरातमधील एका हिंदू कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या गांधींनी लंडन येथील इनर टेंपल येथे कायद्याचे प्रशिक्षण घेतले. महात्मा गांधी २१ वर्ष दक्षिण आफ्रिकेत राहिला. येथेच गांधींनी पहिल्यांदा नागरी हक्कांच्या मोहिमेत अहिंसक प्रतिकार केला. १९१५ साली ते भारतात परतले. भारतात परतताच त्यांनी शेतकरी आणि शहरी मजुरांना अत्याधिक जमीन-कर आणि भेदभावाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ते नेटाने शेवटपर्यंत लढले.

देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारणात मोलाचा वाटा उचलणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा आज जन्मदिवस. स्वतंत्र भारताचे सहावे पंतप्रधान पद भूषवण्याची संधी लाल बहादूर शास्त्री यांना लाभली. आजच्याच दिवशी जन्मलेल्या महात्मा गांधींचा लाल बहादूर शास्त्री यांच्यावर प्रभाव होता. गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत शास्त्री यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशमधील मुघलसराई या गावात झाला. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. मात्र शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लाल बहादूर शास्त्री यांची आई आपल्या तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली. घरी सर्वजण त्यांना ‘नन्हे’ नावाने हाक मारीत.

१९३० साली महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले.
१९४६ साली काँग्रेस सरकार स्थापन झाले. काँग्रेसने शास्त्री यांना उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव पदावर नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावरही नियुक्त झाले. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले.

इंदिरा एकादशी २०२३

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी असे म्हणतात. इंदिरा एकादशी पितृपक्षात येते.या एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे सात पिढ्यांपर्यंतचे पितृ तृप्त होतात. ही एकादशी प्रामुख्याने पितरांना समर्पित केली जाते आणि या दिवशी पितरांसाठी दान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो. त्याच्या आत्म्याला शांती मिळते.या एकादशीचे व्रत जो स्वतः करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो.

सर्वपित्री अमावस्या २०२३

अश्विन महिन्यात येणारी अमावस्या सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी पितृ पक्षाची समाप्ती होते. पितृ पक्षात पृथ्वीवर आलेले आपले पूर्वज सर्वपित्री अमावस्येला निरोप घेतात. ज्या पितरांची मृत्यूची तारीख आपल्याला माहित नाही अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी घातले जाते. या दिवशी पिंड दान करण्याचे सर्वात जास्त महत्त्व आहे.

नवरात्र

नऊ दिवसांची नवलाई, नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे कपडे यामुळे महिलावर्गात नवरात्रीची जास्त क्रेझ आढळून येते.
सर्वपित्री अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होते.अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते आणि नवमी तिथीच्या दिवशी कन्या पूजनाने देवीला निरोप दिला जातो.

दसरा

भगवान राम यांनी दुष्ट रावणाचा वध केल्याने दुष्ट प्रवृत्तीचाही अंत झाला. यानिमित्ताने विजयोत्सव साजरा करण्यासाठी दसरा सण भारतात साजरा केला जातो. या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता. या निमित्तानेही दसरा सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी देवी दुर्गाने महिषासुर या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते. उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये या सणाला दसरा म्हणतात. या दिवशी रामलीलाची समाप्ती होते आणि देव रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते.

हे ही वाचा 

भारताला सैनिक आणि शेतकऱ्याचे महत्त्व पटवून देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती…

कोथरुडमध्ये ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’, आठवडाभर रंगणार गांधींजींच्या विचारांचा जागर!

म्हणून २ ऑक्टोबर पासून भारतात स्वच्छ भारत मिशन सुरु झाला…

पाशांकुशा एकादशी

अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा वा पापांकुशा एकादशी असे म्हटले जाते. पुराणांनुसार, पाशांकुशा एकादशीचे व्रत करणाऱ्यांना एका तपाचे पुण्य प्राप्त होते. पाशांकुशा एकादशीला श्रीविष्णुंच्या पद्मनाथ स्वरुपाचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे.पाशांकुशा एकादशीमुळे सर्व पापांचा नाश होतो. पापातून मुक्तता मिळते. या एकादशीला दानधर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असून, याच्या प्रभावामुळे सूर्य यज्ञाचे फलप्राप्त होते, असे सांगितले जाते.

कोजागिरी पौर्णिमा

आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते. याला कोजागरी असेही म्हणतात. या दिवशी रात्री लक्ष्मी दर्शनासाठी पृथ्वीवर येते. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्याच्या सर्व सोळा चरणांमध्ये पूर्ण असतो. या दिवशी खीर तयार करून चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते आणि या दिवशी रात्री पृथ्वीवर अमृताचा वर्षाव होतो असे मानले जाते. शरद पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा केली जाते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी