33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रVideo : वयाच्या सत्तरीत आजी-आजोबांचं शुभमंगल! शिरोळ वृद्धाश्रमातील आनंददायी बातमी

Video : वयाच्या सत्तरीत आजी-आजोबांचं शुभमंगल! शिरोळ वृद्धाश्रमातील आनंददायी बातमी

घोसरवाड ( ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील अशाच दोन समदुःखी वृध्दांनी वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृध्दाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून धुम़डाक्यात लग्न लावून दिल्याने या लग्नाची खूपच चर्चा रंगली आहे.

वृध्दापकाळात नातेवाईक वाऱ्यावर सोडले की आपला आयुष्यातील साथीदार एकमेकांना धीर देत कसेबसे जीवन जगत असतात. मात्र साथीदारालाही दैवाने हिरावून घेतले तर वृध्दाश्रमाशिवाय पर्याय उरत नाही. घोसरवाड ( ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील अशाच दोन समदुःखी वृध्दांनी वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृध्दाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून धुम़डाक्यात लग्न लावून दिल्याने या लग्नाची खूपच चर्चा रंगली आहे.

अनुसया शिंदे ( वय 70 मुळ रा. वाघोली, जि. पुणे) अशी वृध्द नववधू तर वराचे बाबूराव पाटील ( वय 75, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) नाव आहे. दोघेही दोन वर्षांपासून येथील वृद्धाश्रमात आहेत. शरीराने स्वावलंबी असले तरी मानसिकदृष्ट्या खचलेल्या आहेत. दोघांचेही साथीदार देवाघरी गेले आहेत. त्यामुळे या समदुःखी वृध्दांनी एकमेकांच्या आयुष्यातील दुःखाचा पाढा वाचून मन मोकळे करता करता दोन्ही मने जुळली आणि लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्यचा निर्णय घेतला. दोघांचीही तयारी असल्याने व कायदेशीर सल्ला घेवून गुरुवारी वृध्दाश्रमातच मांडव घालून ग्रामस्थ व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पद्धतीने थाटात लग्न लावून देत वृद्धांची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे या वृध्द जोडप्यांचा लग्न खूपच चर्चेची ठरली आहे.

हे सुद्धा वाचा

काय सांगता! कसोटीमध्ये अश्विनच्या नावावर विराट कोहलीपेक्षा जास्त धावा

दिलासादायक: राज्यात अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेताचे पंचनामे होणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

UPSC: नोकरदारांना खास संधी..! 577 जागांसाठी नोकरभरती; आजच अर्ज करा

या लग्नात जात, धर्म नाही की कुंडली नाही. शरीर सुखाची आस नाही की कोणत्याही संपत्ती, हुंड्याची आशा नाही. उर्वरित आयुष्यात सुखदुःखात सहभागी होवून एकमेकांना मायेचा आधार असावा इतकीच माफक अपेक्षा या वृध्द जोडप्यांना आहे.

वृध्दांनी स्वखुषीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनी विचारपूर्वक निर्णय घेतल्याने व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांची इच्छा पूर्ण करुन सहचरणीबरोबर आनंदी जीवन जगण्यासाठी थाटात लग्न करून दिले. लग्नानंतरही वृध्दाश्रमातच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
-बाबासाहेब पुजारी
(जानकी वृध्दाश्रम चालक, घोसरवाड)

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी