27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रदिलासादायक: राज्यात अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेताचे पंचनामे होणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दिलासादायक: राज्यात अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेताचे पंचनामे होणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बीच्या पिके अक्षरशः भुईसपाट झाले आहे. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. त्यामध्ये सरकारी मदतीची अपेक्षा असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दखल घेतली आहे. नुकतीच जिल्हाधिकारी यांच्याशी ऑनलाइन संवाद साधून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागून पंचनामे करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. याबाबत तसे ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा :

सरकारच्या निषेधार्थ बळीराजाने केली कांद्याची होळी..!

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा राडा; कांदा-लसणाच्या माळा घालून केलं आंदोलन

कर्जमाफी योजना असूनही महाराष्ट्रात २०२२ मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी