31 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमहाराष्ट्रपंढरपुरात नथुराम गोडसेंचा नारा

पंढरपुरात नथुराम गोडसेंचा नारा

मुंबईमध्ये काही दिवसांआधी मीरा रोड येथील प्रकरण तापत असताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच आता पंढरपुरामध्ये नथुराम गोडसेंची बॅनरबाजी करण्यात आली आणि त्यांच्या नावाचा नारा लावण्यात आल्याचा दावा कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ‘x’ ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. अशा समाज कंठकांना देशामध्ये खपवून घेतलं जाणार नाही. सरकारने यावर कठोर कारवाई करावी. दरम्यान काही दिवसांपासून देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक घटना घडत आहेत. यामुळे समाजात द्वेश पसरला जात असल्याचं बोललं जातंय.

महात्मा गांधी यांना नथुराम गोडसे यांना गोळ्या घालून हात्या केली होती. यामुळे देशामध्ये संतापाची लाट उठली होती. तर अशातच महात्मा गांधीनी देशाला योगदान दिलं. त्याचं काम आणि त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा अशा अनेक बाबीतून त्यांच्यामुळे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मात्र प्रजासत्ताक दिनी पंढरपुरामध्ये काही तरूणांनी नथराम गोडसेंची बॅनरबाजी केली आहे. नथुराम गोडसेनं गांधीजींना मारल्यानं देशातील अनेकजण नथुराम गोडसे यांना देशद्रोही म्हणतात. तर काहीजण त्यांचा जयजयकार करतात. असंच काहीसं पंढरपुरात घडलं असल्याची माहिती वडेट्टीवर यांनी दिली आहे.

हे ही वाचा

नाशिक जिल्हयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या विविध पदांच्या नियुक्त्या जाहीर

आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल!, मनोज जरांगे-पाटलांची मुख्यमंत्र्यांना गळाभेट

मनोज जरांगेंच्या सरकारकडे ‘या’ मागण्या

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंठकांनी जयजयकाराच्या घोषणा देत पोस्टरबाजी केल्याचे समोर आले आहे. या समाजकंठकांवर सरकारने कठोर कारवाई करावी. महाराष्ट्राच्या मातीत नथुराम गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही’, असं ट्विट आता विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये

व्हिडीओ पाहिल्यावर त्यामध्ये नथुराम गोडसेंचा फोटो पाहायला मिळत आहे. तर त्याच्याच खाली ‘द आयडीयल ऑफ हिंदुत्व’ ( The Ideal Of Hindutva) असं लिहिलं आहे. यामध्ये एक तरूणाने डोक्यामध्ये भगवी टोपी घातलेली दिसत आहे. तो जोरजोरात नथुराम गोडसेंच्या घोषणा देत आहे.  याविरोधात विजय वडेट्टीवार यांनी अशा समाजकंठकांवर लवकरात लवकर कारवाई करावी आणि उदत्तीकरण खपवून घेतलं जाणार नसल्याचं ते म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी