30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रआम्ही ठरलोय आज सक्सेसफुल!, मनोज जरांगे-पाटलांची मुख्यमंत्र्यांना गळाभेट

आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल!, मनोज जरांगे-पाटलांची मुख्यमंत्र्यांना गळाभेट

राज्यामध्ये गेली अनेक दिवसांपासून मराठा समाज सरकारकडे आरक्षणाची (Maratha reservation) मागणी करताना दिसत आहे. अंतरवाली सराटीमध्ये सध्या सुरू असलेल्या आरक्षणाची सुरूवात झाली. त्यानंतर आतपर्यंत आरक्षणाची मागणी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. आंदोलनही सुरू आहे. अशातच अंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी प्रवास होता. मात्र मराठा बांधव आणि मनोज जरांगे-पाटील (Manoj jarange-patil)) यांना वाशी येथे रोखण्यात आलं. अशातच आता सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच गुन्हे मागे घेणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. यामुळे मराठा समाजाचा गुलाल आता निश्चित झाला आहे. यावेळी २७ जानेवारी दिवशीच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्यूस घेऊन मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं आहे.

सध्या मनोज जरांगे-पाटील हे वाशी येथे आहेत. त्यांनी सरकारनं जर आध्यादेश दिला तर आझाद मैदान येथे जाऊन गुलाल उधळणार असं सांगितलं. शनिवारी आझाद मैदानाकडे कूच करणार असल्याचं ते म्हणाले. तसेच जर आध्यादेश जर मिळाला नाहीतर त्याच ठिकाणी उपोषण करणार असल्याचं ते म्हणाले. मात्र आध्यादेश मिळाल्यानं आंदोलन थांबवलं आहे.

सगेसोयऱ्यांनाही मिळणार प्रमाणपत्र

वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मनोज जरांगे-पाटील आणि मराठा बांधव एकवटले होते. ते मुंबईला आगेकूच करत होते. मात्र सरकारचा आध्यादेश आल्यानं मराठा बांधवांचा लढा यशस्वी झाला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्यावतीने १३ मागण्या सरकारपुढं मांडल्या होत्या. त्यातील ५४ लाख मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या आहेत. तर त्यातील सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचं बोललं जात आहे. तर अंतरवाली सराटी येथे मराठा समाजावर गुन्हे दाखल केले होते हे गुन्हे देखील मागे घेतले जाणार असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा

काळा घोडा, मुंबई महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; नक्की भेट द्या

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रजासत्ताक दिन 

नथुराम गोडसे कुणाचा हीरो? (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख – भाग ३)

मनोज जरांगेंच्या प्रमुख तीन मागण्या

५४ लाख कुणबी प्रमाणपत्र सापडले आहेत त्यांना आरक्षण द्यावं.

कुणबी नोंदी सापडणाऱ्या समाजाला सरसकट आरक्षण द्यावं.

नोंदी सापडलेल्या सगेसोयऱ्यांना आरक्षण द्यावं.

या प्रमुख तीन मागण्या मान्य करून मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांनी वाशी य़ेथे भेट घेऊन गुलाल लावला. मराठा समाजानं हक्काची लढाई जिंकली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी