33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रRakshabandhan 2022 : रक्षाबंधनाच्या दिवशी 'रक्षणकर्त्या'नेच गमावला जीव

Rakshabandhan 2022 : रक्षाबंधनाच्या दिवशी ‘रक्षणकर्त्या’नेच गमावला जीव

खानापूर तालुक्यातील भिवघाट ते पळशी रस्त्यावर हिवरे गावाच्या हद्दीत दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. नवनाथ जनार्दन पाटील (वय 60, रा. पळशी, ता. खानापूर) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून नवनाथ आज सकाळी रक्षाबंधनासाठी बहिणीकडे विट्याला जात असताना ही घटना घडली.

राज्यभरात आज रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भाऊ- बहिणीचे पवित्र नाते उलगडणाऱ्या या दिवशी आज एका दुर्देवी घटनेने अनेकांचे मन हेलावून गेले. खानापूर तालुक्यातील भिवघाट ते पळशी रस्त्यावर हिवरे गावाच्या हद्दीत दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. नवनाथ जनार्दन पाटील (वय 60, रा. पळशी, ता. खानापूर) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून नवनाथ आज सकाळी रक्षाबंधनासाठी बहिणीकडे विट्याला जात असताना ही घटना घडली. रक्षाबंधनाच्या दिवशी एका बहिणीने आपल्या भावाला अशा पद्धतीने गमावले म्हणून सगळीकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास विजापूर ते गुहागर राष्ट्रीय महामार्गावरून कराडच्या दिशेने कर्नाटक पासिंगचा (केए 23 ए 3441) एक ट्रक निघाला होता. दरम्यान वाटेत रस्ता विचारण्यासाठी भिवघाट परिसरातील कल्याणी पेट्रोल पंपसमोर हा ट्रक थांबला. त्याचवेळी पळशीहून विट्याकडे रक्षाबंधनासाठी नवनाथ जनार्दन पाटील हे आपल्या दुचाकीवरून भरधाव वेगाने निघाले होते. दुचाकीचा वेग इतका जास्त होता की या ट्रकला पाठीमागून जनार्दन पाटील यांनी जोरदार धडक दिली.

Navnath Patil

हे सुद्धा वाचा

Azadi ka Amrit Mahotsav : धनंजय मुंडे – डॉ. प्रीतम मुंडे येणार एकत्र!

VIDEO : नेरूळमध्ये ‘तिरंगा रॅली’

MLA Anil Babar wife : आमदार पत्नीचे निधन, कुटुंबियांनी घालून दिला आगळावेगळा आदर्श

या धडकेत पाटील गंभीर जखमी झाले. या घटनेचे समजताच त्यांचे बंधू राजाराम पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि नवनाथ यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत असल्याचे घोषित केले. अपघात झाल्याचे कळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी