30 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्रसदाभाऊ खोतांच्या सरकारकडे शेतकऱ्यांच्या वतीने मागण्या

सदाभाऊ खोतांच्या सरकारकडे शेतकऱ्यांच्या वतीने मागण्या

टीम लय भारी

मुंबई : शाहीन चक्रीवादळाच्या वाऱ्यांमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थिती व अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांच्या झालेल्या नुकसानाकडे सदाभाऊ खोत यांनी लक्ष वेधले आहे. (Sadabhau Khot Demands on behalf of the farmers to the government )

एकामागोमाग एक संकटे शेतकऱ्यांवर येत असताना सरकार मात्र आम्ही तुम्हाला मदत करू, या पलिकडे काहीच बोलायला तयार नसल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.

चित्रा वाघ यांचा पोलीस खात्याला उलट सवाल

नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना धमक्यांसहित फुकट सल्ले

देवेंद्र सरकारच्या काळात मदतीसाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली नव्हती असे म्हणत सदाभाऊ पुढे म्हणाले की सध्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कसलीही मदत करीत नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी वेगवेगळी पॅकेजेस देऊन शेतकऱ्यांना मदत केली तसेच त्यांच्या काळात कर्जमाफी सुद्धा झाली.

महापुरात ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारने २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे असे सदाभाऊ खोत म्हणाले. त्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून अजून बऱ्याच माग्न्युअ आहेत. पुढे ते म्हणतात, सरसकट पंचनामे करा, सरसकट विम्याचे पैसे द्या, सरसकट सर्व शेतकऱ्यांचे पीककर्ज तातडीने माफ करा. बागायाती शेतकऱ्यांना व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आणि जिरायती शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत करावी.

आदित्य ठाकरेंचे कार्बन संतुलित शहरांसाठी प्रयत्न

sharad pawar: शरद पवार शेतकऱ्यांचे नाही, तर उद्योजकांचे नेते; आमदार खोत यांची टीका

खासदार नवनीत राणा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासहित अनेकांनी मुख्यमंत्र्यांवर पूरग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन निशाणा साधला आहे.

कोरोना, पूर यासारख्या अचानक उद्भवलेल्या आपत्तीनंतर आर्थिक दृष्ट्या खिळखिळे झालेले सरकार यावर काय उपाययोजना करेल याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी