31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रRohit Pawar : आमदार रोहित पवारांनी टिपले वाघोबांना !

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांनी टिपले वाघोबांना !

लय भारी टीम

ताडोबा :  जामखेड – कर्जतचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नुकतीच आपल्या कुंटुबासोबत ताडोबा व्याग्र प्रकल्पाला भेट दिली.  कोरोना काळात आपल्यासह अनेकजण घरात होते. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले. वेळ मिळताच आमदार रोहित पवार यांनी कुंटुबाला वेळ दिला.

पशू-पक्षांच्या डौलदार,सावध, बिनधास्त, सुस्त, रागीट, निवांत अशा विविध स्थितीतल्या हालचाली टिपण्याचा मी केलेला प्रयत्न केला अशा आशयाची पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली आहे.

अनेकदा वन्य पशू-पक्षी पाहण्यासाठी आपण दुसरीकडं जातो, पण याबाबत महाराष्ट्रच समृद्ध आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची क्षमता असल्याने आपल्या राज्यातील ताडोबासारख्या (Tadoba) या प्रकल्पाला आपणच प्रमोट केलं पाहिजे, हे वैभव जगापर्यंत पोचवलं पाहिजे असं ही त्यांनी म्हटले आहे.

जंगलातला वाघ बघण्याची गेल्या तीन वर्षांपासूनची मुलांची इच्छा होती. काहीशी सवड मिळाल्याने कुटुंबासह पूर्ण झाली. साक्षात वाघ बघून मुलं खूप आनंदी झाली आणि तो आपल्याला घाबरत का नाही? असं विचारलं.

मी त्यांना म्हणालो, “वाघाला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने तो कुणाला घाबरत नसतो. म्हणूनच आपणही वाघासारखंच रहायचं असतं आणि प्रामाणिकपणे काम करताना कोण काय म्हणतंय याकडं ढुंकूनही बघायचं नसतं. हत्ती सुद्धा रस्त्याने जात असताना आजूबाजूला ओरडणाऱ्यांकडं लक्ष देत नसतो.” हे ऐकून मुलंही म्हणाली, “महाराष्ट्रही असाच आहे ना बाबा!”

हे देखील पाहा: 

http://<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/6EtK117XrWM” title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture” allowfullscreen></iframe>

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी