30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रसंत रोहिदास महाराजांनी देशाला सामाजिक व आध्यात्मिक उंचीवर नेले : धनंजय मुंडे

संत रोहिदास महाराजांनी देशाला सामाजिक व आध्यात्मिक उंचीवर नेले : धनंजय मुंडे

टीम लय भारी

पुणे : आज कात्रज, पुणे संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शिवशंभूनगर, येथील गुरु रविदास महाराज मंदिरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता(Saint Rohidas Maharaj took the country to social and spiritual heights: Dhananjay Munde).

या कार्यक्रमात धनंजय मुंडे म्हणाले, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महान संत रोहिदास महाराज. त्यांच्या नावाने सामाजिक न्याय विभागामार्फत पुढील वर्षीपासून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. राज्य सरकार सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुणे येथील कार्यक्रमात दिली. पुरस्काराचे स्वरूप व क्षेत्र आदी बाबी शासन स्तरावर निश्चित करेल, असेही धनंजय मुंडे म्हणाले. विविध उपक्रम व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Saint Rohidas Maharaj took the country to social and spiritual heights: Dhananjay Munde
संत रोहिदास प्रत्येक समाज घटकाला समान वागणूक मिळावी, जाती-पातीच्या भिंती कोसळून एकमेकांप्रती प्रेम व आदरभाव निर्माण व्हावा या महान विचारसरणीचे होते

संत रोहिदास महाराजांनी भक्तिमार्गाने देशभरात प्रचार केला आहे. देशाला सामाजिक व आध्यात्मिक उंचीवर पोचवले. प्रत्येक समाज घटकाला समान वागणूक मिळावी, जाती-पातीच्या भिंती कोसळून एकमेकांप्रती प्रेम व आदरभाव निर्माण व्हावा या महान विचारसरणीचे होते. सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळामार्फत राज्यातील तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात येतील. महामंडळाचे भागभांडवल यावर्षी पासून वाढविण्यात येणार असून, याची अधिकृत घोषणा लवकरच होईल, असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

धनंजय मुंडेंनी शायरीतून दिल्या शरद पवारांना शुभेच्छा ,काळजी घेण्याचं केलं आवाहन

पंकजा मुंडेंना धक्का, वडवणी नगरपंचायतीवर धनंजय मुंडे गटाची सत्ता

पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचं उत्तर : म्हणाले, एक कमळसुद्धा उभं केलं नाही

Mumbai Woman Withdraws Rape Case Against Minister Dhananjay Munde; NCP Reacts

कार्यक्रमस्थळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांसाठी पुस्तकांचे दालन ठेवण्यात आले, तसेच बार्टीच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, उपायुक्त उमेश सोनवणे, नगरसेवक प्रकाश कदम, अखिल भारतीय रविदाशिया धर्म संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर, रतनलालजी सोनाग्रा यांसह आदी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी