32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयधनंजय मुंडेंनी शायरीतून दिल्या शरद पवारांना शुभेच्छा ,काळजी घेण्याचं केलं आवाहन

धनंजय मुंडेंनी शायरीतून दिल्या शरद पवारांना शुभेच्छा ,काळजी घेण्याचं केलं आवाहन

टीम लय भारी

मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी लवकर बरं व्हावं म्हणून राजकीय वर्तुळातले अनेक जण तसंच त्यांचे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देत आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही शरद पवार यांना शायरीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.( Dhananjay Munde wished Sharad Pawar through poetry, appealed to him to take care)

 धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देणारं ट्वीट केलं आहे.

या ट्वीटमध्ये त्यांनी एक शेरही लिहिला आहे. आपल्या ट्वीटमध्ये धनंजय मुंडे म्हणतात, “चल रहा युद्ध होवक्त भी विरुद्ध हो। फिर भी आपको लढना हैक्योंकी आपकी पहचान एक योद्धा’ है। शरद पवार साहेबलवकर बरे व्हाकाळजी घ्या !!

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी ३ राज्यांच्या निवडणुका लढणार,शरद पवारांची माहिती

धनंजय मुंडे यांची शरद पवारांच्या नावाने मोठी योजना, ‘या’ दुर्लक्षित घटकांची जबाबदारी घेणार सरकार

Person playing role of Ravan is not himself Ravan, says Sharad Pawar on NCP MP Amol Kolhe as Godse in film

 शरद पवार यांना करोनाची लागण

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षखासदार शरद पवार यांना करोनाची लागण झाली आहे. पवार यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहनही केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणतातमाझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी