29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र'त्या' विधानानंतर संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

‘त्या’ विधानानंतर संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

दोनच दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली. त्यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी आमचे शेतावरुन भांडण नसल्याचे म्हटले होते. तसेच एका वृत्तवाहिनीला मुलाखती दरम्यान त्यांनी पवार हे भाजपसोबत असल्याचे म्हटले होते. त्यावर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया दिली असून अॅड. प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीसोबत (MVA) यायचे असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतील स्तंभांवर बोलू नये असा सल्ला दिला आहे. (Sanjay Raut advises Prakash Ambedkar not to make statements about MVA chiefs)

संजय राऊत म्हणाले वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती झाली आहे. तसेच ते पुढील काळात मविआचे घटक व्हावेत अशी देखील आमची इच्छा आहे. परंतू त्यांनी मविआचे जे मुख्य स्तंभ आहेत त्यावर बोलू नये, शरद पवार हे देशाचे नेते असून भाजपविरोधात आघाडी करण्याच्या प्रयत्नातील ते मुख्य स्तंभ आहेत. भाजपच्या यंत्रणांनी सर्वाधिक हल्ले शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर केले, असे देखील राऊत म्हणाले.

आंबेडकर यांचे मतभेद असतील मात्र त्यांनी अशी वक्तव्ये करु नयेत. मी तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अॅड. आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केली असून भविष्यात त्यांच्यातील मतभेद असतील तर आम्ही एकत्र बसून दूर करु, परंतू त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी अशी वक्तव्य करु नयेत असा सल्ला राऊत यांनी दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एका मुलाखतीमध्ये शरद पवार भाजपसोबत असल्याचे विधान केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले होते. शिवसेनेसोबत नुकतीच वंचितची युती झाली असून आगामी निवडणुका शिवसेना आणि वंचित एकत्र लढणार आहेत. मात्र वंचित बहूजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची देखील युती होणार का याबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत.

 हे सुद्धा वाचा

शाहरुखसाठी इंग्लंडच्या सरकारने केले होते असे काही; मराठी दिग्दर्शकाने सांगितला १८ वर्षांपूर्वीचा स्टारडमचा किस्सा

महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाकडे पालकांची पाठ ; महापालिकेच्या ‘सीबीएससी’, ‘आयसीएससी’च्या ८६८ जागांसाठी चार हजारपेक्षा अधिक अर्ज

सत्यजित तांबे यांची चुप्पी; तर भाजपची भूमिका देखील अस्पष्ट

प्रकाश आंबेडकर यांनी मविआकडे वाटचाल करावी असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र मविआ आणि वंचित युतीची अद्याप तरी युतीबाबत चर्चा नाही. त्यामुळे भविष्यात मविआ आणि वंचित युती होईल का याबाबत देखील जनमाणसांत चर्चा सुरु आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानानंतर संजय राऊत यांनी त्यांना अशी विधाने करु नयेत असा सल्ला दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी