33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयसत्यजित तांबे यांची चुप्पी; तर भाजपची भूमिका देखील अस्पष्ट

सत्यजित तांबे यांची चुप्पी; तर भाजपची भूमिका देखील अस्पष्ट

काँग्रेसमधून बंडखोरी करत सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघासाठी (Nashik Graduate Constituency Election) अपक्ष अर्ज भरल्यानंतर या निवडणुकीत आता दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. भाजप सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना पाठींबा जाहीर करणार अशी चर्चा सुरू होती. मात्र अद्याप भाजपने देखील त्याबाबत खुलेपणाने कोणतीही भूमिका मांडलेली (BJP’s role unclear) नाही. तर सत्यजित तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन झाल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील का? अशी देखील चर्चा सुरू आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत सत्यजित तांबे यांनी अद्याप तरी तशी काही भूमिका बोलून दाखवली नाही. तर भाजपने देखील आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Satyajit Tambe’s silence on BJP support; So BJP’s role is also unclear)

दरम्यान सत्यजित तांबे यांनी आपला प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून मतदार संघात त्यांचे दौरे आणि भेटीगाठी सुरू आहेत. जळगाव दौऱ्यावर सत्यजित तांबे आले असता. भाजपच्या पाठींब्याबाबत त्यांनी काहीच प्रतिक्रीया दिली नाही. योग्यवेळ आल्यानंतर भूमिका स्पष्ट करेन असे ते म्हणाले. त्यामुळे सत्यजित तांबे यांना भाजप पाठींबा देणार की सत्यजित तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार याबबत चर्चांना उधान आले आहे.

सत्यजित तांबे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील रिंगणात असून त्यांना महाविकास आघाडीने पाठींबा जाहीर केलला आह. त्यामुळे सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यातच खरी लढत होणार आहे. सत्यजित तांबे अपक्ष लढत असले तरी त्यांनी भाजपकडे देखील पाठींबा मागितला होता. मात्र भाजपने अद्यापतरी भूमिका स्पष्ट केली नसून सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी भाजप वाट पाहत असल्याच्या चर्चा देखील लोकांमध्ये सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा 

महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमाकडे पालकांची पाठ ; महापालिकेच्या ‘सीबीएससी’, ‘आयसीएससी’च्या ८६८ जागांसाठी चार हजारपेक्षा अधिक अर्ज

रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिका लागू करा; माजी आरोग्य मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

ड्रॅगनने भारताच्या २६ चौक्या गिळल्या; पण सरकार म्हणतं आम्ही एक इंचही जमीन नाही गमावली

निवडणुका आता चार दिवसांवर आल्या असून उमेद्वारांनी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. मतदार संघात घर भेटी, प्रचार सभा, संघटनांच्या भेटीगाठी सुरू आहेत. सत्यजित तांबे यांनी देखील आपला प्रचार धडाक्यात सुरु केला असून त्यांचे मतदार संघात सध्या जोरदार दौरे सुरू आहेत. जळगाव दौऱ्यात देखील त्यांनी मतदारांच्या भेटी घेत आपला प्रचार केला. निवडणुक जवळ आली असली तरी सत्यजित तांबे यांनी आपली भाजपबाबतची भूमिका स्पष्ट केली नाही. तर दूसरीकडे भाजपने देखील पाठींब्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी