33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeसिनेमा'माणदेश एक्स्प्रेस' ललिता बाबरचा संघर्ष लवकरच मोठ्या पडद्यावर; अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत

‘माणदेश एक्स्प्रेस’ ललिता बाबरचा संघर्ष लवकरच मोठ्या पडद्यावर; अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत

‘माणदेश एक्स्प्रेस’ अशी ओळख असलेली माणदेशाची कन्या आशियाई चॅम्पियन धावपटू ललिला बाबरचा (Lalita Babar) संघर्ष लवकरच मोठ्या पडद्यावर (Biopic) येणार आहे. धावपटू ललिता बाबर हिच्या क्रीडाक्षेत्रातील अतूलनीय कामगिरीवर ‘ललिला शिवाजी बाबर’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटामध्ये मराठीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर (Amrita Khanvilkar) ललिता बाबरची व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. हा चित्रपट २६ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Biopic on Lalita Babar struggle soon Amrita Khanvilkar in lead role)

अभिनेत्री अमृता खानविलकरणे या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले असून तीने म्हटले आहे की, नमस्कार, प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या खास दिवशी हि खास घोषणा. ललिता शिवाजी बाबर, नवा चित्रपट. चंद्रमुखीची कात टाकून आता हि नवी कात ओढण्याची वेळ… नव्या वर्षाचं नवं स्वप्नं …. नवं धाडस … नवी परीक्षा. एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या राष्ट्राचेच नाही तर देशाचे हि नाव जागतिक स्तरावर नेले आहे. याहून सुखावह काही असूच शकत नाही. हे शिवधनुष्य मी एक अभिनेत्री म्हणून तर उचलं आहेच पण ह्या वेळीस जबाबदारी मोठी आहे. तुमची साथ तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असुद्या. असे अमृता खानविलकरणे तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषि नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत.

हे सुद्धा वाचा

उपजिल्हाधिकारी बनलेल्या धावपटू ललिता बाबरने शेतात घेतला ऊसाचा आस्वाद, शेतकऱ्यांशीही साधला संवाद

महाराष्ट्रातील ‘ते’ देखणं गाव पाहण्यासाठी हरियाणाच्या २५ अधिकाऱ्यांचा आज दौरा

शाहरुखसाठी इंग्लंडच्या सरकारने केले होते असे काही; मराठी दिग्दर्शकाने सांगितला १८ वर्षांपूर्वीचा स्टारडमचा किस्सा
माण तालुक्यातील मोही गावची लेक
ललिता बाबर हिच्या क्रीडा क्षेत्रातील जडणघडण आणि तिचा संघर्ष या चित्रपटातून लवकरच समोर येणार आहे. वर्षानूवर्षे दुष्काळी अशी ओळख असलेल्या माण तालुक्यातील मोही हे ललिता बाबर यांचे मुळ गाव. घरची परिस्थिती देखील बेताचीच होती. वडिल चालक होते. लहानपणी शाळा शिकत शिकत ललिता बाबर शेळ्यामेंढ्या चारायला जात असे.  शाळेत असताना तिला क्रिडाक्षेत्रात आवड असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर ललिला बाबरने थांबण्याचे नावच घेतले नाही. राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पारितोषिके तिने पटकाविली. तिचा हा संपूर्ण संघर्ष आता चित्रपटरुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी