29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणविसांचे अथक प्रयत्न, परदेशात निधन झालेल्या महिलेचा मृतदेह मुंबईत आणला!

देवेंद्र फडणविसांचे अथक प्रयत्न, परदेशात निधन झालेल्या महिलेचा मृतदेह मुंबईत आणला!

राज्याच्या सध्याच्या राजकीय साठमारीने हा प्रांत आपला नाही असे म्हणून अनेकांनी हल्ली टीव्ही पाहणे बंद केले आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आरोप-प्रत्यारोप यामुळे टीव्हीचे स्क्रीन व्यापलेले आहे. असे असतानाही राजकारणात काही मंडळी अशा आहेत ज्या संवेदना जपून काम करत असतात. देवेंद्र फडणवीस हे त्यापैकी एक. राज्याच्या राजकारणात फडणवीस यांच्यासारखा अभ्यासू नेता नाही. त्यामुळेच की काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुडबुकमध्ये ते जाऊन बसले आहेत. अशा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे एका मामाला मृत भाचीचे अखेरचे दर्शन झाले.

नालासोपारा, वसई येथील रविवासी निलेश म्हात्रे यांची भाची कुमारी रूही राऊत (नालासोपारा, वसई) हिच्या अकस्मात परदेशी निधनानंतर तिचे पार्थिव भारतात आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप मेहनत घेतली आहे.
आमच्यावर हा अचानक आलेला आघात आणि दुःखाचा डोंगर यातून आमच्या भाचीचे पार्थिव भारतात कसे आणि कधी येणार याची चिंता आम्हाला होती, परंतु आपण या सर्व गोष्टींकडे जातीने लक्ष देऊन, स्वतः भारतीय दूतावास यांच्याशी संपर्कात राहून आम्हाला खूप मोठा आधार दिला. तसे पाहिले तर या सर्व बाबतीत माझे अस्तित्व आपल्यापुढे खूपच नगण्य पण याचा थोडासाही विचार न करता माणुसकी आणि फक्त माणुसकी या नात्याने आपण आम्हाला खूप मोठा आधार दिला. तुमचे आभार व्यक्त करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमची कृपादृष्टी अशीच आमच्यावर राहूदे ही प्रार्थना. असे पत्र निलेश म्हात्रे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहून त्यांचे आभार मानले आहे.
हे सुद्धा वाचा
ठाण्यातला असाही रक्षाबंधन तुम्ही पहिला का?
दहीहंडी उत्सव : गोविंदासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय !
शरद पवारांच्या मदतीला उद्धव ठाकरे धावले !

गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन भाजपला जावून मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. हे कारस्थान फडणवीस यांनी सत्तेत येणीसाठी केले, असा आरोप त्यांच्यावर शिवसेना आणि अन्य विरोधकांनी केला. 2 जुलै रोजी अजित पवार आठ आमदारांसह भाजपच्या कळपात गेले. त्यामुळे फडणवीस यांच्यावर पुन्हा टीका झाली. ती टीका अजूनही विरोधक करत आहेत. असे असताना फडणवीस आपल्या पद्धतीने काम करत आहेत. नुकतेच ते सहा दिवसाच्या जपान दौऱ्यावर गेले होते. तेव्हा राज्यात कांद्याचा प्रश्न उग्र झाला. पण फडणवीस यांनी जपानमधून केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह, पीयूष गोयल यांच्याशी फोन वर संवाद साधून हा प्रश्न मिटवला होता. राज्यातील भाजपचे चाणक्य अशीही विरोधकांनी त्यांची प्रतिमा तयार केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी