33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र'त्या' सात जणांची आत्महत्या नव्हे, तर हत्याच

‘त्या’ सात जणांची आत्महत्या नव्हे, तर हत्याच

पुणे शहरापासून ४३ किलोमीटर अंतरावर असलेल्या दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रातील 'त्या' सात जणांच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात मागील सहा दिवसांत सात जणांचे मृतदेह आढळल्याने पुणे जिल्हा हादरला होता. या घटनेनंतर पोलिसही चक्रावून गेले होते. या आत्महत्या आहेत की हत्या याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, आता या रहस्यावरील पडदा उठला असून नातेवाईकांनीच अत्यंत निर्घृणपणे या सात जणांची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. (Serial killing Murder of seven family members in Pune) अत्यंत सुनियोजितपणे या हत्येचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी चार संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भीमा नदीपात्रात बुधवारी १८ जानेवारी रोजी काही स्थानिक मच्छीमार मासेमारी करीत असताना त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळला. शुक्रवारी २० जानेवारी रोजी एका पुरुषाचा मृतदेह सापडला. शनिवारी २१ तारखेला पुन्हा एका स्त्रीचा मृतदेह आढळला. तसेच २२ तारखेला पुन्हा पुरुषाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. या घटनेननंतर सुरु करण्यात आलेल्या शोधकार्यात तीन मुलांचे मृतदेह हाती लागले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हे सर्व मृतदेह एकाच कुटुंबातील व्यक्तींचे असल्याचे सिद्ध झाले होते.

हे सुद्धा वाचा

भीमा नदीच्या पात्रात चार मृतदेह आढळल्याने खळबळ

५० हजार सैनिकांना यमसदनी पाठवणारी विषकन्या : माता हारी

Shraddha Murder Case : ‘जे झालं ते चुकून झालं!’ श्रद्धा हत्याकाडांचा आरोपी आफताबची न्यायालयासमोर कबूली

पोलिसांची चक्रे फिरली
या हत्या असल्याचा पोलिसांना सुरुवातीपासून संशय होता. मात्र हाती ठोस पुरावा नसल्याकारणाने निश्चित सांगता येत नव्हते. शवविच्छेदनाचा हवाल आल्यानंतर मात्र तपासाची चक्रे वेगात सुरु झाली. या घटनेमागचे धागेदोरे उकरून काढायला सुरुवात केल्यानंतर मोहन पवार त्यांच्या चुलत भावांवर संशय बळावला. त्यांनीच पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

pune suicide news

काळ्या जादूच्या संशयावरून हत्या
हे हत्याकांड काळ्या जादूच्या संशयावरून घडल्याचे आता उघडकीस आले आहे. मोहन पवार यांचा मुलगा अमोल पवार तीन महिन्यांपूर्वी त्याचा चुलत भाऊ धनंजयसोबत त्याची सासरवाडी पेरणे फाटा येथे गेला होता. तिथून घरी परतताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात धनंजयचा मृत्यू झाला होता. मात्र, अमोल या अपघातातून बचावला. त्यानंतर धनंजयच्या कुटुंबियांच्या मनात संशय निर्माण झाला. धनंजयचा अपघातात मृत्यू झाला नसून त्याची हत्या झाल्याचा संशय त्यांना आला होता. मोहन पवार यांच्या कुटुंबाने मिळून धनंजयवर काळी जादू केली आणि त्याची हत्या केली, असा धनंजयच्या घरच्या लोकांना संशय होता. या संशयातूनच त्यांनी मोहन पवार आणि त्यांच्या कुटुंबाला भीमा नदीकाठी अडवलं. त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तीन लहानग्यांसह सातजणांना नदीत फेकून दिलं. यात सातही जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मृतांची नावे :
मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०),( दोघे रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड),
जावई शाम पंडित फलवरे (वय २८), मुलगी राणी शाम फलवरे (वय २४ वर्षे),
नातू रितेश उर्फ भैय्या शाम फलवरे (वय ७), छोटू शाम फलवरे (वय ५) आणि कृष्णा शाम फलवरे (वय ३, सर्वजण रा. हातोला, ता. वाशी, जि. धाराशिव)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी