28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत ईडीची कारवाई तर दिल्लीत पवार-गडकरी-राऊत एकत्र

मुंबईत ईडीची कारवाई तर दिल्लीत पवार-गडकरी-राऊत एकत्र

टीम लय भारी

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. मात्र काल दिल्लीत वेगळचं चित्र पाहायला मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी चहापानाच्या कार्यक्रम झाला.Sharad Pawar hosts dinner for minister

सदर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्रातले अनेक आमदार काल रात्री जेवणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जमले होते. या चहापानाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, मंत्री दादासाहेब भुसे देखील उपस्थित होते.

या स्नेहभोजनाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे, श्रीकांत शिंदे, खासदार सुनील तटकरे, डॉ. फौजिया खान, विनायक राऊत,ओमराजे निंबाळकर या खासदारांनी उपस्थिती लावली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आदिती तटकरे, सुनील शेळके, रोहित पवार, झिशान सिद्धीकी, अनिकेत तटकरे, डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासोबत काही भाजप आमदारांनीही उपस्थित लावली आहे. gadkari reached sharad pawar dinner

महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ANI शी बोलताना असं सांगितलं की, पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांना लोकसभेच्या सचिवालयाने पाच आणि सहा एप्रिल रोजी होणाऱ्या दोन दिवसीय अभिमुखता कार्यक्रमासाठी दिल्लीला बोलावलं आहे. हेच निमित्त साधून आम्हीही सहभोजन आयोजित केलं आहे. ही केवळ सदिच्छा भेट आहे. Sharad Pawar hosts dinner for minister

हे सुध्दा वाचा:

संजय राऊत यांनी पत्रकार म्हणून आपल्या यशाचे गमक सांगितल्यास, अन्य पत्रकारही आपली प्रगती करु शकतात

शरद पवार के रात्रिभोज में पहुंचे गडकरी, महाराष्ट्र में बढ़ी राजनीतिक सरगर्मी

पोलिसांना आदेश देण्याची गरज नाही

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी