35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रअधिकारी आज निवृत्त होणार होता, अन् काल लाच घेताना पकडला !

अधिकारी आज निवृत्त होणार होता, अन् काल लाच घेताना पकडला !

टीम लय भारी

धुळे: शिरपूर पंचायत समितीचे (Shirpur panchayat samiti)गटविकास अधिकारी सेवानिवृत्त होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पंचायत समितीच्या (Shirpur panchayat samiti)आवारात ४ लाखाची लाच घेतांना रंगेहात पकडले गेले आहेत.

त्याच सोबत अकॉॅउट विभागातील २ कर्मचाºयांच्या देखील त्यात समावेश आहे़ विशेषत: त्यांचा १ एप्रिल रोजी सेवानिवृत्त निमित्त सत्कार समारंभाचे देखील आयोजन पंचायत समितीकडून (Shirpur panchayat samiti) करण्यात आले होते़. प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.

कोणा केली तक्रार ?

जिल्हा परिषदेच्या (Jilha parished) हाडाखेड नावाच्या शाळेत प्राथमिक शिक्षक असलेले तक्रारदार यांनी आपल्या घराच्या दुरुस्ती कामासाठी आपल्या भविष्य निर्वाह निधीतून पाच लाख रुपये मिळण्यासाठी अर्ज केला होता. या बदल्यात संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने धुळे (Dhule) जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Shirpur panchayat samiti)अधिकाऱ्यांनी सापळा रचून या अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना आज रंगेहात पकडले आहे.
त्यानंतर समजले की उद्या श्री अमरिश भाईंच्या हस्ते त्यांचा निरोप समारंभ व सत्कार ठेवण्यात आला होता.

हे सुध्दा वाचा :

सेवानिवृत्तीच्या दिवशीच लाचखोर बीडीओ जाळ्यात…

मंत्रालय प्रवेश आता सर्वांसाठी खुला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी