33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रAjit Pawar :अजित पवारांनी सांगितल्या लहाणपणीच्या करामती, लोकांमध्ये पिकला हशा!

Ajit Pawar :अजित पवारांनी सांगितल्या लहाणपणीच्या करामती, लोकांमध्ये पिकला हशा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडी, कन्हेरी गावातील बालपणीच्या आठवणी सांगितल्या गावतील लक्ष्मीमाता मंदिराच्या लोकार्पण सोहळया निम‍ित्त ते काटेवाडीमध्ये गेले होते. त्यावेळी अजित पवारांचे जुने मित्र देखील उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते, तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काटेवाडी, कन्हेरी गावातील बालपणीच्या आठवणी सांगितल्या गावतील लक्ष्मीमाता मंदिराच्या लोकार्पण सोहळया निम‍ित्त ते काटेवाडीमध्ये गेले होते. त्यावेळी अजित पवारांचे जुने मित्र देखील उपस्थित होते. अजित पवारांनी बालपणीच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. अजित पवार यांची एक खास विनोदी शैली आहे. त्यांनी विनोद केला की हशा हा पिकतोच.‍ अजित पवार म्हणाले की, त्यावेळी कान्हेरीचा माळ आणि आजची कन्हेरी यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. पूर्वी या ठिकाणी पाणी नव्हते. कालव्यावरुन पाईपलाईन आणायचा खर्च पाहून सारे गप्प बसायचे. नंतर एकापाठोपाठ एक पाच योजना आल्या.

Ajit Pawar :अजित पवारांनी सांगितल्या लहाणपणीच्या करामती, लोकांमध्ये पिकला हशा!

यावेळी त्यांनी कन्हेरीत त्यांच्या सवंगडयांबरोबर घालवलेला क्षणांचा क‍िस्सा सांगितला. मला आठवते, कन्हेरीतील या माळावर दत्ता शिंदे, अकबर, मुल्ला असे आम्ही मित्र फ‍िरायला जायचो. एकदा बाहेरची जनावरे आली होती. मग आम्ही ट्रॅक्टर घेऊन जनावरांना ताणत होतो. अजित पवरांनी त्यावेळच्या भाषणाचा आणखी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, इथल्या लोकांवर पारधी समाजातील काही जणांकडून हल्ला झाला. त्यानंतर बरेच काही घडले. ते फार खोलवर जाऊन सांगत नाही. दादांनी हा किस्सा सांगताच कन्हेरीचे बाळासाहेब पवार यांनी त्यांच्या कानात ती व्यक्ती समोरच होती असे सांगताच एकच हशा पिकला.

हे सुद्धा वाचा

खळबळजनक : शरद पवारांनी आणलेल्या प्रकल्पाला रामराजे नाईक निंबाळकरांचा कोलदांडा !

Ganeshotsav 2022, : ‘कुठे राज ठाकरेंचे विचार आणि कुठे हा फडतूस कार्यकर्ता…’

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोरगरीबांचे कैवारी वाटतात का ? जाणून घ्या सामान्य लोकांच्या इरसाल प्रतिक्रिया

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले फार मोठे नाव आहे. या नावाची प्रसार माध्यमांमध्ये नहेमीच चर्चा होते. अजित पवार हे आताचे विरोधी पक्ष नेते आहे. त्यामुळे संसदेमध्ये ते एखादा विषय मांडतात. त्यावेळी ते आता काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच असते. अजित पवार हे नेहमी मर्मावर बोट ठेवून बोलतात. विनोदातून समोरच्याला चिमटा काढणे हे एक त्यांचे स्वभाव वैशिष्य आहे. अजित पवार यांना शेतकऱ्यांविषयी खूप जिव्हाळा आहे. कारण त्यांना शेतीचा वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा व्यवसाय करायचे तर आजी शेती करायची. त्यांचे ग्रामीण ढंगातले विनोद लोकांना फार आवडतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी