28 C
Mumbai
Saturday, August 5, 2023
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रDevendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज पुण्यात!

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज पुण्यात!

राज्यातील सत्तांतराच्या खेळात राजकीय वर्तुळातील चित्र संपुर्ण बदलले असून विकासकामांच्या व्याख्या सुद्धा बदलल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुका सुद्धा तोंडावर आल्यामुळे सत्ताधारी चांगलेच कामाला लागले आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या विकासकामांच्या माध्यमातून पुणेकरांना खूष करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, पण पुणेकर याला कितपत दाद देणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

पुण्यात जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी असे हे उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यात उद्घाटन सोहळ्यांचा सुद्धा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विकासकामांचे उद्घाटन म्हणजे एक सुंदर पर्वणीच म्हणता येईल. पुणे स्टेशन ई-बस डेपो उदघाटन, ई-बसेसचा लोकार्पण सोहळा,नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नोंदणी व मुद्रांक भवन इमारतीचे भूमीपुजन, पुणे फेस्टिव्हलचे उदघाटन अशा विविधांगी कार्यक्रम सोहळ्यास देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा आज पुणे दौरा आयोजित करण्यात आला असून आजचा दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे उद्धाटन करण्यात संपून जाणार आहे. आज दुपारी 2 वाजता कार्यक्रमाची सुरूवात होणार असून यावेळी पुणे स्टेशन ई-बस डेपो उदघाटन समारंभ व ई-बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. पुणे स्टेशन ई-बस डेपो, साधू वासवानी चौक, पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

Uddhav Thackeray : शहाजी पाटलांचा कार्यक्रम ‘ओके’ करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निवडला चुकीचा माणूस !

Maharashtra Politics : भाजप – मनसेची युती होणार, अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात होणार शिक्कामोर्तब !

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी थोपटले दंड, मोठे आंदोलन उभारण्याची तयारी

त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नोंदणी व मुद्रांक भवन या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करणार असून येथील विविध ई-सुविधांचा शुभारंभ सुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रम नवीन प्रशासकीय इमारत परिसर, विधानभवन समोर, पुणे येथे पार पडणार आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, नेहरु स्टेडियमजवळ, स्वारगेट येथे पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन करणार आहेत.

राज्यातील सत्तांतराच्या खेळात राजकीय वर्तुळातील चित्र संपुर्ण बदलले असून विकासकामांच्या व्याख्या सुद्धा बदलल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुका सुद्धा तोंडावर आल्यामुळे सत्ताधारी चांगलेच कामाला लागले आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या विकासकामांच्या माध्यमातून पुणेकरांना खूष करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, पण पुणेकर याला कितपत दाद देणार, पुण्यात पुन्हा भाजप बहुसंख्येने निवडून येणार का, की आणखी कोणाला पुणेकर पसंती देणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी