32 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : शहाजी पाटलांचा कार्यक्रम ‘ओके’ करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निवडला चुकीचा...

Uddhav Thackeray : शहाजी पाटलांचा कार्यक्रम ‘ओके’ करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निवडला चुकीचा माणूस !

कलाकार शहाजीबापू पाटील यांचा सांगोल्यातच काटा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एक हुकमी एक्का निवडला आहे. प्रत्यक्षात हा हुकमी एक्का नसून शहाजी पाटील यांनाच फायदा करून देणारा छुपा रूस्तूम आहे. ‘लय भारी’ने मिळविलेल्या माहितीतूनच ही वस्तुस्थिती समोर आली आहे. लक्ष्मण हाके असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार शिवसेनेतून फुटले. या सगळ्या आमदारांना धडा शिकविण्याची तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. गुवाहाटीमध्ये जाऊन विनोदी नकलाकार अशी अख्ख्या महाराष्ट्राला ओळख करून देणारे आमदार शहाजीबापू पाटील यांचा सुद्धा यात समावेश आहे. नकलाकार शहाजीबापू पाटील यांचा सांगोल्यातच काटा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एक हुकमी एक्का निवडला आहे. प्रत्यक्षात हा हुकमी एक्का नसून शहाजी पाटील यांनाच फायदा करून देणारा छुपा रूस्तूम आहे. ‘लय भारी’ने मिळविलेल्या माहितीतूनच ही वस्तुस्थिती समोर आली आहे. लक्ष्मण हाके असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला काहीच फायदा होणार नाही. उलट अप्रत्यक्षरित्या शहाजीबापू पाटील यांनाच फायदा होणार आहे. भविष्यात लक्ष्मण हाके हे मोठे झाल्यास शिवसेनेच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे होणार असल्याची चर्चा सांगोल्यात सुरू आहे. सांगोला आणि कै. गणपतराव देशमुख यांचे अतुट नाते अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. तब्बल 55 वर्षे आमदार म्हणून कै. गणपतराव देशमुख यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. सन 2019 ची विधानसभा निवडणूक गणपतराव देशमुख यांनी लढविली नाही.

लोकांनी फार आग्रह केल्यामुळे त्यांनी त्यांचा नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली होती. या अनिकेत देशमुख यांना 98 हजार 696 मते मिळाली. तर विजयी झालेल्या शहाजी पाटील 99 हजार 464 मते मिळाली. शहाजी पाटील अवघ्या 768 मतांनी विजयी झाले. यावेळी लक्ष्मण हाके हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांना फक्त 267 मते मिळाली होती. स्वतःच्या गावातही त्यांना जेमतेम 52 मते मिळाली होती. ज्या व्यक्तीला गावच्या गल्लीतही कुणी विचारत नाही, अशा व्यक्तीला उद्धव ठाकरे यांनी मोठ्या सन्मानाने शिवसेनेते घेतले. डॉ. अनिकेत देशमुख यांची मते फोडणे, व शहाजी पाटील यांना अप्रत्यक्ष मदत करणे अशीच भूमिका हाके यांची त्या निवडणुकीत राहिली होती.

हे सुद्धा वाचा…

Maharashtra Politics : भाजप – मनसेची युती होणार, अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात होणार शिक्कामोर्तब !

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी थोपटले दंड, मोठे आंदोलन उभारण्याची तयारी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोरगरीबांचे कैवारी वाटतात का ? जाणून घ्या सामान्य लोकांच्या इरसाल प्रतिक्रिया

आपल्या विनोदी नकलांनी शहाजी पाटील यांनी सांगोल्याचे नाव अख्ख्या महाराष्ट्रात बदनाम करून टाकले आहे. कै. गणपतराव देशमुख यांनी सांगोल्याला जो मान मिळवून दिला होता, तो शहाजी पाटील यांनी घालवून टाकला आहे. त्यामुळे शहाजी पाटील यांच्याविषय़ी मतदारसंघात मोठी नाराजी आहे. पुढच्या निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ आहे. पण हा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी कै. गणपतराव देशमुख यांच्या वारसदार उमेदवाराला ताकद देणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकाने तशी व्यूहरचना केली तरच शहाजी पाटील यांच्या सहजपणे चारी मुंड्या चित होतील.

लक्ष्मण हाके यांच्यासारख्या बिनकामाच्या लोकांना शिवसेनेने हाताशी धरलेले पाहून खुद्द शहाजी पाटील यांना सुद्धा आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील. हे लक्ष्मण हाके मध्यंतरी विजय वडेट्टीवार यांच्या निकट गेले होते. वडेट्टीवार यांच्या एनटी, ओबीसी बहुजन परिषदेच्या संघटनेत ते काम करीत होते. विजय वडेट्टीवार यांच्या वरदहस्ताने त्यांनी मागासवर्गीय आयोगावर स्थान मिळविले होते. पण महाविकास आघाडीची सत्ता जाताच त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या संघटनेला सोडून दिले, अन् शिवसेनेत बेडूकउडी मारली. विधानसभा निवडणुकीत अवघी 267 मते मिळविणाऱ्या व्यक्तीला उद्धव ठाकरे कसेकाय जवळ करतात याबद्दल सांगोल्याच्या जनतेमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कै. गणपतराव देशमुख हे आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षासोबत निष्ठावंत राहिले. त्यामुळे त्यांचे वारसदार सुद्धा याच पक्षातून निवडणूक लढवतील. डॉ. बाबासाहेब देशमुख किंवा डॉ. अनिकेत देशमुख या दोघा भावांपैकी एकजण कै. गणपतराव देशमुख यांचा वारसा पुढे चालविण्याची धुरा खांद्यावर घेणार आहेत. शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे शहाजी पाटील यांच्या चारीमुंड्या चित करायच्या असतील तर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना कै. गणपतराव देशमुख यांच्या वारसदारांवरच अवलंबून राहावे लागेल, असे स्थानिक पातळीवरील चित्र आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी