32 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यभरात उद्यानांमधून उलगडणार शिवचरित्र! शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

राज्यभरात उद्यानांमधून उलगडणार शिवचरित्र! शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला यावर्षी 350 वर्षे पुर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यभरातील अनेक शहरांमध्ये शिवचरित्रावर आधारित उद्याने उभारणार असल्याची आणि त्यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे.

महाराष्ट्राचा वार्षिक अर्थसंकल्प 2023 राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केला. या अर्थसंकल्यापत राज्य सरकारमार्फत अनेक नव्या योजनांचा आणि तरतूदींचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला यावर्षी 350 वर्षे पुर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यभरातील अनेक शहरांमध्ये शिवचरित्रावर आधारित उद्याने उभारणार असल्याची आणि त्यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

विधीमंडळात गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मविआ आक्रमक

कोकण किनारपट्टीला उन्हाच्या झळा; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

नागपूरात आजपासून कलम 144 लागू ; वाचा काय आहेत नियम

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे 350वे वर्ष आहे. यामुपळेच दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राज्याभिषेक महोत्सवासाठी राज्यसरकारमार्फत तब्बल 350 कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये छत्रपती शिवरायांचे चरित्र उलघडतील अशी उद्याने तयार करणार असल्याचेही या अर्थसंकल्पात म्हंटले आहे. यासाठी प्रामुख्याने पुण्यातील आंबेगाव येथे तब्बत 50 कोटींची तर, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शहरांसाठी एकुण 250 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर संग्रहालय उभारणीसाठी आणि इतर शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी एकूण 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी