29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रLay Bhari : ‘लय भारी’च्या कार्यकारी संपादकपदी सुधाकर काश्यप यांची नियुक्ती !

Lay Bhari : ‘लय भारी’च्या कार्यकारी संपादकपदी सुधाकर काश्यप यांची नियुक्ती !

‘लय भारी’च्या (Lay Bhari) कार्यकारी संपादक पदावर ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काश्यप (Sudhakar Kashyap) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकतीच कार्यकारी संपादकपदाची सूत्रे हाती घेतली. व्यवस्थापकीय संचालक तथा व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात (Tushar Kharat) आणि संपादक विक्रांत पाटील (Vikrant Patil) यांनी काश्यप यांचे ‘लय भारी’ परिवारात स्वागत केले. सुधाकर काश्यप गेली 28 वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. मुंबईतील प्रमुख वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांत (Newspapers and news Channels) त्यांनी वार्ताहर पदापासून ते क्राईम  संपादक (Crime News ditor) पदापर्यंत काम केले आहे. (Sudhakar Kashyap appointed as executive editor of ‘Lay Bhari’)

सुधाकर काश्यप यांनी टीव्ही 9, महाराष्ट्र 1, आयबीएन लोकमत या वृत्तवाहिन्यांत तसेच आपला महानगर या वृत्तपत्रातही काम केले आहे. टीव्ही 9 व महाराष्ट्र 1 या वृत्तवाहिन्यात त्यांनी क्राईम संपादक म्हणून काम केले आहे. ‘आयबीएन लोकमत’चे प्रिन्सिपल करसपॉंडंट आणि ‘ईटीव्ही मराठी’चे सीनिअर क्राईम रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. आपला महानगर या दैनिकातून त्यांनी 1993 मध्ये पूर्णवेळ पत्रकारितेची सुरुवात केली. 2004 मध्ये मुख्य गुन्हे प्रतिनिधी असताना ते टीव्ही पत्रकारितेकडे वळले.

सुधाकर काश्यप यांनी मुंबई विद्यापीठातून सोशिऑलॉजी आणि पॉलिटिकल सायन्सची पदवी घेतली आहे. गुन्हेविषयक वार्तांकन म्हणजेच क्राईम रिपोर्टिंगमध्ये त्यांचा हातखंडा आहे. या घडीला मुंबईतील गुन्हे जगताची इत्थंभूत माहिती असलेल्या व पोलिस वर्तुळात चांगले संबंध असलेल्या मोजक्या पत्रकारांपैकी एक अशी काश्यप यांची ओळख आहे. 28 वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक प्रकरणे आणि घोटाळे शोधून काढले आहेत. 1997 मध्ये ‘आपलं महानगर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तमालिकेनंतर सुधाकर काश्यप यांनी कुख्यात शेखर हरिजन प्रकरणात डॉ. सत्यपाल सिंग, प्रदीप शर्मा आणि दया नायक यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

1998 मधील तीन तरुणांच्या बनावट चकमकीचे प्रकरण उघडकीस आणले
1998 मध्ये मीरा रोड परिसरात तीन तरुणांच्या बनावट चकमकीचे प्रकरणही त्यांनी उघडकीस आणले होते. यासंबंधी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवसेना-भाजप सरकारच्या काळात, 1998 मध्येच बांगलादेशी बेकायदेशीर स्थलांतरितांवर केलेल्या कारवाईत हैदराबादमधील एका भारतीय महिलेला ताब्यात घेतल्याचे खोटे प्रकरण काश्यप यांनी उघडकीस आणले होते. या बातमीवर विधानसभेत चर्चा झाली आणि त्या महिलेची तात्काळ सुटका करण्यात आली होती.

हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्या हत्येची सत्यकथा मांडणारे पहिले पत्रकार
अंडरवर्ल्डसह गुन्हेगारी आणि न्यायालयांशी संबंधित काश्यप यांचे बातम्या-घडामोडींशी संबंधित कव्हरेज टीव्ही न्यूज चॅनेल्सवर प्राइम टाईममध्ये प्रसारित झाले आहे. ‘आयबीएन लोकमत’साठी मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचे सतत तीन दिवस कव्हरेज त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळांहून केले होते. कामा हॉस्पिटलजवळ हेमंत करकरे आणि अशोक कामटे या दोन आयपीएस अधिकारी तसेच एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांच्या हत्येची सत्यकथा मांडणारे सुधाकर काश्यप हे पहिले पत्रकार होते. गँगस्टर छोटा राजनची मुलाखत काश्यप यांनी घेतली आहे.

मोस्ट वॉन्टेड डॉन सदा पावले याच्या एन्काऊंटरची स्टोरी ब्रेक
मुंबई अंडरवर्ल्डचा मामा अशी ओळख असलेला खतरनाक गॅंगस्टर आणि मोस्ट वॉन्टेड डॉन सदा पावले याच्या एन्काऊंटरची स्टोरी ब्रेक करून काश्यप यांनी या प्रकरणाचा चांगलाच पाठपुरावा केला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेपत्ता प्रकरणाची ब्रेकिंग बातमीही त्यांनीच दिली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेल्या ‘शहरी नक्षलवादी’शी संबंधित त्यांच्या स्पेशल स्टोरीजही चांगल्याच गाजल्या होत्या.

मुंबईतील महत्त्वाच्या प्रकरणांचे सखोल वार्तांकन
1996 मधील गाजलेला शेरेगर घोटाळा, सलमान खान हीट अँड रन प्रकरण, महामुंबईतील टोळीयुद्ध (गॅंगवॉर), मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची अटक, टाडा कोर्टात अबू सालेमचे प्रत्यार्पण, माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक विरुद्धचा खटला, बेस्ट बेकरी खटला, तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कडून मौलाना गुलाम याह्या अल्लाह बक्श याच्यासह अनेक लष्कर-ए-तोयबा दहशतवाद्यांची अटक, 2006 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, गुरुनाथ मयप्पन प्रकरण, आयपीएल स्पॉट-फिक्सिंग यासंबंधीचे वेगळे आणि बहुविध वार्तांकन सुधाकर काश्यप यांनी केले आहे. अँटिलिया प्रकरण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटक, साखर कारखान्यांच्या घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी तसेच ईडी संबंधित बातम्या त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडल्या होत्या. चांदीवाल आयोगाची स्थापना आणि त्याबाबतचा पाठपुरावा यातही काश्यप यांची भूमिका महत्त्वाची होती.

हे सुद्धा वाचा

Lay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !

‘लय भारी’च्या शिरपेचात मानाचा तुरा; तुषार खरात यांना अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार


लय भारीने सर्वप्रथम मांडलेले आकाशवाणी स्थलांतर, वसुलीभाई सत्तारभाईचे प्रश्न अधिवेशनात गाजले


‘पोलिस फाइल’, ‘बखर पोलिसांची’ स्तंभ गाजले

‘आपला महानगर’मधील सुधाकर काश्यप यांच्या दैनंदिन गुन्हेगारी कथा, ब्रेकिंग स्टोरी तसेच सीनियर आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलाखतीही चर्चेचा विषय ठरल्या होत्या. ‘पोलिस फाइल’ आणि ‘बखर पोलिसांची’ हे त्यांचे स्तंभही गाजले होते. सुधाकर काश्यप यांचा टीव्ही पत्रकारीतेतील दांडगा अनुभव लक्षात घेता ते ‘लय भारी’ला डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या उंचीवर घेवून जातील, अशा विश्वास तुषार खरात यांनी व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी