33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते सरदार पटेल,महात्मा गांधी यांच्या पत्रव्यवहारावरील ग्रंथ प्रकाशित

सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते सरदार पटेल,महात्मा गांधी यांच्या पत्रव्यवहारावरील ग्रंथ प्रकाशित

भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनेक स्वतंत्र संस्थानांचे देशात विलीनीकरण करणाऱ्या सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र दार्शनिका विभागाने (Maharashtra Gazetteer Department) सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला पत्रव्यवहार ग्रंथरुपाने संपादित केला आहे. मंगळवारी, (31 ऑक्टोबर) वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले. दार्शनिका विभागाच्या हीरकमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, हिरक दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, “सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्यातील पत्रव्यवहार म्हणजे देशाला प्रेरणा देणारा ऐतिहासिक वारसा आहे,” असे प्रतिपादन केले.

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, “सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्यातील पत्रव्यवहार म्हणजे देशाला प्रेरणा देणारा ऐतिहासिक वारसा आहे. दुर्दैवाने सध्या मतभेदाकडून मनभेदाकडे असे सामाजिक व राजकीय क्षेत्रात वातावरण आहे. अश्या काळात एकमेकांच्या विचारांचा आदर, एकमेकांप्रती संवेदनशीलता जपत तितक्याच ताकदीने विचारांची स्पष्ट मांडणी करणारा हा पत्रव्यवहार सर्वांना उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल.”


“देशाच्या इतिहासात सरदार पटेल यांच्या बद्दलचा आदर चिरंजीव राहणार आहे. त्यांचे देशावर मोठे ऋण आहे. देशातील 565 संस्थाने त्यांनी विलीनीकरण केले आणि कणखरपणा दाखवून दिला. देशाच्या एकात्मता आणि अखंडतेत त्यांची महत्वाची भूमिका आहे. गॅझेटियर विभागाने महात्मा गांधीजी आणि पटेल यांच्यातील पत्रव्यवहार प्रकाशित केला आहे. मोठ्या नेत्यातील संवादाची भाषा कशी होते हे या पत्रव्यवहारातून कळून येते,” ते म्हणाले.

हे ही वाचा 

एकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा आमचा पक्ष मोठा, तरीही बैठकीला आमंत्रण का नाही?

गणपतराव देशमुखांच्या नातवाने मराठ्यांसाठी केले मुंडण !

कुणबी मराठा नोंदी सापडलेल्यांना मिळणार कुणबी मराठा प्रमाणपत्र; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

ते पुढे म्हणाले की, “महात्मा गांधींनी या पत्रव्यवहारातून देशाला सत्य आणि अहिंसा यापासून डगमगू नका, असा संदेश दिला आहे. अहिंसा हा जगाने मान्य केलेल विचार आहे. महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यातील पत्रव्यवहारातून मतभेद असले तरीही किती संवेदनशीलपणे मांडता येतात, एकमेकांप्रती आदर याविषयी स्पष्टता निदर्शनास येते. कोणतीही भूमिका ही तर्कसंगत पद्धतीने मांडली गेली पाहिजे. भावनेवर नाही तर भविष्याचा वेध घेत त्याचे नियोजन करत पुढे जायला हवे हे त्याकाळात या पत्रव्यवहारातून दिसून येते. या ग्रंथाद्वारे हा पत्रव्यवहार सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे.”

यावेळी, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, आमदार डॉ पंकज भोयर, दार्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर यावेळी उपस्थित होते. दार्शनिका विभागाच्या हीरकमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आज या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी