33 C
Mumbai
Wednesday, May 17, 2023
घरराजकीयउद्धव ठाकरे यांचे मातोश्रीबाहेर ओपन कारमधून भाषण

उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीबाहेर ओपन कारमधून भाषण

शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता आक्रमक झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना बांधणीच्या काळात एकाप्रसंगी कारच्या टपावर उभे राहून भाषण केले होते. आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री (Matoshree) निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची (Shiv Sainiks) मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काळया रंगाच्या सनरुफ कारमधून भाषण केले. (Uddhav Thackeray addressed Shiv Sainiks outside Matoshree Nivasthan)

शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे गट देखील आता मोर्चेबांधणीला लागला असून आज त्यांनी आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांची बैठक देखील तातडीने बोलावली आहे. त्याच दरम्यान मातोश्रीवर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कारच्या सनरुफमधून शिवसैनिकांना संबोधीत केले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी कारच्या बोनेटवरुन भाषण केल्याचा प्रसंग आठवला. यावेळी ठाकरे म्हणाले, आपण पुन्हा एकजूटीने लढू, चोरांचा नायनाट करु, शिवसेना संपवता येणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
हे सुद्धा वाचा

चोरीचे धनुष्य बाण घेऊन निवडणुकीला सामोरे या..! उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना आमदाराचा इशारा…

पक्ष गेले, चिन्ह गेले..! आता शिवसेना भवनासाठी होणार ‘सामना’? सविस्तर वाचा

शिवसैनिकांशी संवाद साधताना आज ठाकरे भावूक झाल्याचे देखील दिसून आले, ठाकरे म्हणाले आज तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, मात्र मी खचलेलो नाही, खचणार नाही, आज पासूनच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना यावेळी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी