33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीय'महिलांचा अनादर करणाऱ्यांना देव..', कंगना राणौतचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

‘महिलांचा अनादर करणाऱ्यांना देव..’, कंगना राणौतचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने दणका दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ट्विटरवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारच्या काळात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कंगनाच्या घराचा काही भाग पाडला होता. त्यावेळी कंगनाने उद्धव ठाकरेंना उद्देशून सूचक विधान केले होते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारून सोबत 40 आणि नंतर 50 आमदारांना एकत्र घेत भाजपशी हातमिळवणी करून राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी खरी शिवसेना आपली असल्याचा दावा त्यांनी केला. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नाव आणि चिन्हावरून लढा सुरू होता. मात्र निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दोन्ही दिल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्याचवेळी कंगना राणौतचे या मुद्द्यावरचे ट्विट आता चर्चेचा विषय ठरत आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंगना रणौतने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “देवांचा राजा म्हणजेच इंद्रलाही गैरवर्तन केल्यावर शिक्षा मिळते. तो फक्त एक नेता आहे. जेव्हा त्याने माझे घर तोडले, तेव्हा मला वाटले त्याचे वाईट दिवस सुरू होतील. एका महिलेचा देव अपमान करणाऱ्यांना शिक्षा देतो. पुन्हा कधीही उठणार नाही.” असे म्हणत कंगनाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कंगनाच्या घराचा काही भाग पाडला होता. त्यावेळीही कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती, ‘आज माझे घर तुटले, उद्या तुझा अभिमान तुटेल.’ अशा भावना तिने त्यावेळी व्यक्त केल्या होत्या.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलं आहे. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का लागला आहे. दरम्यान, या निर्णयावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर मोठी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली.

हे सुद्धा वाचा : उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीबाहेर ओपन कारमधून भाषण

निवडणूक आयोग मोदींचे गुलाम ; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चोरीचे धनुष्य बाण घेऊन निवडणुकीला सामोरे या..! उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी