30 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरमहाराष्ट्रशिवसेना शाखेवरुन ठाण्यात ठाकरे-शिंदे गटात राडा

शिवसेना शाखेवरुन ठाण्यात ठाकरे-शिंदे गटात राडा

शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यापासून शिवसेना शाखांवर कोणाचा हक्क यावरुन सध्या शिंदे-ठाकरे गटात चढाओढ लागली असून ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरुन दोन गटात सोमवारी (दि.6) संध्याकाळी जोरदार राडा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. ठाण्यातील शिवाईनगर येथील शिवाई शाखा ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आक्रमक झाला. ही शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे-ठाकरे गटात ठाण्यात राडा झाला आहे. (Thackeray-Shinde group between Clash in Thane on Shiv Sena branch)

उद्धव ठाकरे यांनी रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील सभेतून एकनाथ शिंदे यांच्या गटाला लक्ष्य केले होते. तर भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनी मुंबईतील वरळी येथून आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. यावेळी शिंदे यांनी देखील ठाकरे यांच्या टीकेला प्रत्यूत्तर दिले. त्यानंतर आज ठाण्यात शिवसेना शाखेवरुन राडा झाला आहे. शिवसेनेत फुट पडल्यापासून ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात शाखांवरुन वादविवाद होत आहेत. दरम्यान आता निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यामुळे आता शिवसेना शाखांवर कोणाचा हक्क हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा प्रकरण ; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

GITA GPT: जीवनातील समस्यांवर भगवद्गीतेचा AI उपाय?

महत्वाची बातमी : यापुढे नोकरभरतीत ट्रान्सजेंडरनाही आरक्षण; पोलीस दलातही ‘तिसरा पर्याय’

आज शिवाईनगर येथे दोन गटातील शिवसैनिकांमध्ये वादावादी झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोन्ही गटातील राड्यानंतर येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी