33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeमनोरंजनAI इंटेलिजेंसमुळे नोकरी गमावणारा 'टॉम' हा पहिला..; IAS सुप्रिया साहू यांचे वास्तववादी...

AI इंटेलिजेंसमुळे नोकरी गमावणारा ‘टॉम’ हा पहिला..; IAS सुप्रिया साहू यांचे वास्तववादी ट्विट

ChatGPT सारख्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस सॉफ्टवेअरने सामग्री तयार करण्याच्या क्षमतेने इंटरनेटवर तुफान कब्जा केला आहे. मशीनने माणसाची जागा घेतली जाण्याची भीती असताना, लोकप्रिय कार्टून टॉम आणि जेरीची जुनी क्लिप इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये, टॉम या मांजराची जागा रोबोटिक मांजरीने घेतली आहे. जो उंदीर जेरीला त्याच्या आधुनिक कार्यक्षमतेने पकडतो. सोशल मिडियावर व्हायरल झालेली ही क्लिप खरंच विचार करायला भाग पडणारी आहे. (Tom first to lose job due to AI intelligence..; Tweet by IAS Supriya Sahu)

भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी (IAS) सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या क्लिपमध्ये टॉमच्या मालकाला रोबोटिक मांजर मिळाल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘मेकॅनो-उद्याची मांजर.. ना खाणे, ना गोंधळ ना अंगावरील केस… स्वच्छ आणि कार्यक्षम हे विश्वासार्ह आहे,’असे संबंधित चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.

दरम्यान कार्टूनमधील ती स्त्री टॉमला बोलावते आणि त्याला रोबोटिक मांजर दाखवते. जी माऊस कॅचर म्हणून त्याची जागा बदलेल. त्यानंतर ती स्त्री मेकॅनो चालू करते. ते रोबोटिक मांजर जेरीला अगदी कुशलतेने पकडते आणि त्याला घराबाहेर टाकते. यानंतर निराश टॉम त्याच्या बॅगसह घर सोडतो.

दरम्यान 60 वर्षांपूर्वी, टॉम हा पहिला व्यक्ती होता ज्याने मशीन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपली नोकरी गमावली होती, अशा आशयाचे ट्विट DG साहूने केले आणि हा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला.

बुधवारी शेअर केलेल्या या क्लिपला ट्विटरवर 76.7 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. इंटरनेट वापरकर्त्यांनी या  भविष्यवाणीवर त्यांचे विचार शेअर केले. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, “व्वा!! फ्रेड क्विम्बी टीमने अर्धशतकापूर्वीच याचा अंदाज लावला होता.” दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, “अनेक लेखक आणि कवींनी भविष्याचा अंदाज लावला आहे, खूप चांगले!” तिसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “आता.. ही टॉमची पाळी नाही, माणसाची पाळी आहे.”

हे सुद्धा वाचा : 

गुजरातच्या पाणीपुरीवाल्या मोदीची सोशल मिडियावर धूम! व्हिडिओ होतोय व्हायरल

हृदयस्पर्शी: IPS लेकीने केला DGP वडिलांना सॅल्यूट; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

राणादा आणि पाठकबाईंचं लग्नानंतरचं पहिलं व्हॅलेंटाईन डे; खास क्षण सोशल मिडियावर व्हायरल

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी