31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रOdisha Train Accident : कोरोमंडल ट्रेन दुर्घटनेमध्ये 233 जणांनी प्राण गमावला तर...

Odisha Train Accident : कोरोमंडल ट्रेन दुर्घटनेमध्ये 233 जणांनी प्राण गमावला तर 900 हून अधिक गंभीर जखमी

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरली, यात 900 हून अधिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातून वाचलेल्या एका व्यक्तीने कोरोमंडल एक्सप्रेस दुर्घटनेचा भयानक दृश्याचे वर्णन केले आणि सांगितले, ” रुळावरून घसरलेल्या ट्रेनमधून बाहेर आल्यावर सर्व ठिकाणी रक्त सांडलेले होते काही लोकांचे हातपाय नव्हते.” हा अपघात बालासोर येथील बहंगा स्थानकाजवळ सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोरोमंडल ट्रेन अपघातस्थळी लगेचच धाव घेतली आणि दुर्घटनेतील पीडितांना मदत जाहीर केली.”ओडिशातील या दुर्देवी रेल्वे अपघातातील पीडितांना भरपाई दिली जाईल ; मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रूपये, गंभीर जखमींसाठी 2 लाख रूपये आणि किरकोळ जखमींसाठी 50,000 रू मदत अशी मदत दिली जाईल, असे रेल्वेमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अपघातानंतर स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास मदतकार्य सुरू केले. कोरोमंडल ट्रेन दुर्घटनेमध्ये 233 जणांनी प्राण गमावला तर 900 हून अधिक लोकांना गंभीर दुखापत झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ओडिशातील कोरोमंडल एक्सप्रेस दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि बाधितांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांचे ठाण्याला मोठ गिफ्ट; 1500 हेक्टरवर साकारणार क्ल्स्टर प्रकल्प

IAS transfer : तुकाराम मुंढे यांच्यासह 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या

नोकरीची संधी ! IBPS अंतर्गत 8594 पदांची भरती; पदवीधर असाल तर लगेच करा अर्ज

अपघातग्रस्त मार्गावरील सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. बचावकार्यानंतर ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल. रेल्वे दुर्घटनेनंतर शनिवारी होणारा गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी