केंद्र सरकरने आणलेल्या वाहन कायद्याच्या विरोधामध्ये ट्रक, टॅंकर चालकांनी देशव्यापी संप सुरू केला असल्याचं पाहायला मिळत आहे. (१ जानेवारी) दिवशी नवी मुंबईमध्ये ट्रक चालकांनी आंदोलन केलं होतं. यावेळी काही पोलिसांनी आंदोलनामध्ये मध्यस्ती केली असता पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता या आंदोलनाचा विपरीत परिणाम पेट्रोल पंपांवर होत आहे. ट्रक चालक आंदोलन करत असल्याने पेट्रोल पंप ठप्प आहेत. पेट्रोल, डिझेलचा तुटवडा होऊ शकतो मात्र पंप बंद राहणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याने संपामुळे हजारो टॅंकर डेपो बाहेर थांबले आहेत. याबाबत सोमवारी बैठक घेण्यात आली होती. मात्र त्याचा कोणताही फायद झाला नाही.
३ जानेवारीपर्यंत हा संप राहणार असून त्याचे विपरीत परिणाम आता जाणवू लागले आहेत. ट्रक चालकांच्या आंदोलनामध्ये आता टॅंकर चालकांनी उडी घेतली आहे. दुसरीकडे हा संप लांबल्यास एसटी महामंडळाच्या वाहतुकीवरही इंधन अभावी परिणाम होऊ शकतो. पेट्रोल तसेच डिझेलचा तुटवडा पडण्याची दाट शक्यता असल्याने पेट्रोल पंपाबाहेर मोठ्या प्रमाणात वाहनचालकांनी रांगा लागल्या आहेत. संपाचा परिणाम हा आता राज्यभर होत आहे. इंधन पुरवठा हा मनमाडहून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये होतो. मात्र मनमाडला इंधन पुरवठा ठप्प असल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये इंधन पुरवठा करणं अवघड होईल.
#WATCH | Maharashtra: Long queues at petrol pumps in Nagpur as Transport Association, drivers protest against new law on hit and run cases. pic.twitter.com/FWgQd1F5iH
— ANI (@ANI) January 2, 2024
लातूर शहरामध्ये पेट्रोल साठा संपला
या संपामुळे लातूर शहरामध्ये पेट्रोलचा साठा संपला आहे. याचा परिणाम आता पेट्रोल पंपावरक दिसून येत आहे. ट्रक चालकांनी संप केल्याने पेट्रोल येणार नाही. लोकं आपल्या गाड्या फुल करत आहेत. यामुळे आता पेट्रोल पंपावर जात वाहनचालकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत.
हे ही वाचा
अब्दुल सत्तार यांच्यावर ईडीची तक्रार होईना, ईडी कार्यालयाबाहेर केक कापत तक्रारदराने केला निषेध
ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेक करत पोलिसांवर काठ्यांनी हल्ला
पुण्यात पेट्रोल सुरूच राहणार
पुणे पेट्रोल पंप बंद राहणार नसल्याची माहिती आता पेट्रोलपंप असोशिएशनने दिली आहे. राज्यव्यापी संपामध्ये आम्ही सामिल होणार नसल्याचं पुणे पेट्रोल डिझेल असोशिएशनने स्पष्ट केलं आहे.
हिंगोली आणि अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी
अकोल्यातील अनेक पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. ट्रक चालकांचा संप असल्याने मोठ्या प्रमाणात पेट्रोलपंपाबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच हिंगोलीमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
काय आहे वाहनचालक कायदा?
नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादी व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करणं गरजेचं आहे. तसे न झाल्यास ट्रक चालकावर ७ लाख रूपये दंड आणि ७ वर्षांची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहे.