31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयअब्दुल सत्तार यांच्यावर ईडीची तक्रार होईना, ईडी कार्यालयाबाहेर केक कापत तक्रारदराने केला...

अब्दुल सत्तार यांच्यावर ईडीची तक्रार होईना, ईडी कार्यालयाबाहेर केक कापत तक्रारदराने केला निषेध

राज्यामध्ये अनेक राजकीय नेते, आमदार, खासदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. याआधी पक्षात प्रवेश करण्याची कारणं वेगळी होती, मात्र आता ईडी सारख्या यंत्रणेचा वापर करत सरकार स्थापन करून मतदारांच्या लोकशाहीचा अवमान करताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्यावर काही वर्षांपासून घोटाळ्याचे आरोप आहेत. ज्यावेळेस शिवसेना पक्ष फुटला नव्हता त्यावेळेस अनेक आमदारांच्या मागे ईडीचा वापर करण्यात आला होता. त्यामध्ये अब्दूल सत्तार यांचा देखील समावेश होता. मात्र सध्या अब्दुल सत्तार सत्तेत असल्याने यांच्यावर एका तक्रारदराने तब्बल १८२६ पानी पुरावे देऊनही ईडीनं कोणतीही भूमिका घेतली नसल्याने तक्रारदराने ईडी कार्यालयाबाहेर केक कापत ईडी आणि अब्दुल सत्तार यांच्यावर न होणाऱ्या चौकशीविरोधात निषेध व्यक्त केला आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अनेक दिवसांपासून घोटाळे केल्याप्रकरणी तसेच जमीन हडपल्याप्रकरणी आरोप आहेत. यामुळे एका सिल्लोड येथील तक्रारदराने अब्दुल सत्तार यांच्यावर १८२६ पानी पुरावे दिले आहेत. तरीही ईडी कोणतंही पाऊल उचलायला तयार नाही. सुरूवातील त्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये ७८४ पानांची तक्रार दिली होती. कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर पुन्हा एकदा तक्रारदराने १ जानेवारी २०२३ दिवशी ५६९ पानांची तक्रार केली होती. तिसऱ्यांदा महेश शंकरपल्ली यांनी ईडी कार्यालयात ४७३ पानांची तक्रार दिली आहे. ईडीने दखल न घेतल्यास न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचं शंकरपल्ली म्हणाले आहेत.

हे ही वाचा

ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेक करत पोलिसांवर काठ्यांनी हल्ला

‘देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारीत वाढ’

‘राम कोणत्याही पक्षाचा नाही’

केक कापून तक्रार दिन साजरा

आतापर्यंत कधीच तक्रार दिन साजरा केल्याचं ऐकलं नसेल तसेच पाहिलं नसेल मात्र आता हे खरं आहे. आपल्या पदाचा वापर करत तक्रारदर शंकरपल्ली यांनी गंभीर आरोप केले आहेत. याआधी केवळ एकदा दोनदा नाही तर तब्बल तीनदा ईडीकडे सत्तार यांच्याबाबत १८२६ पानांची नोटीस पाठवली आहे मात्र कोणतंही पाऊल ईडी उचलत नसल्याचं शंकरपल्ली यांचा दावा आहे. याविरोधात शंकरपल्ली यांनी ईडी आणि सत्तार यांच्याविरोधात ईडी कार्यालयासमोर केक कापत वेगळ्या पद्धतीनं निषेध व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी