कळंबोली, उरण, उलवे याठिकाणी ट्रक चालकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं आहे. रस्ते अपघातात अपघातग्रस्तांना मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा या नव्या कायद्याविरोधामध्ये ट्रक चालकांनी आंदोलन केलं आहे. अशातच आता आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून नवी मुंबईमध्ये ट्रक चालकांनी चक्क पोलिसांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे आता आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. या पार्श्वभूमीवर बेलापूर उरण, उरण जेएनपीटी, मार्गावर रास्ता रोको देखील करण्यात आला यामध्ये पोलिसांनी मध्यस्ती केली आणि याउलट पोलिसांना ट्रक चालकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे.
ट्रक चालकांनी केलेल्या आजच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. पोलिसांमुळे ही वाहतूक कोंडी नियंत्रणामध्ये येऊ लागली आहे. वाहनाने अपघात घडून आल्यास तसेच मृत्यू झाल्यास संबंधित कठोर कारवाईचा कायदा नुकताच संमत करण्यात आला आहे. हा कायदा रद्द करण्यासाठी आता चालक रस्त्यावर उतरले. बीडसह आष्टीमध्ये या प्रश्नावरून आंदोलन करण्यात आले असून हा कायदा रद्द करण्यात यावा, नाहीतर चक्काजामचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. जर मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ट्रक चालक आंदोलकांनी दिला आहे.
Massive protest in Navi Mumbai
Truck drivers take to streets & protest against new law giving stricter punishment for hit & run; Panvel-Sion highway blocked@Shivani703 reports | #navimumbai #TruckDriver pic.twitter.com/Ht9vEoHotF
— Mirror Now (@MirrorNow) January 1, 2024
हे ही वाचा
‘देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारीत वाढ’
कपील शर्माला हार्ट अटॅक वाले पराठे खाऊ घातल्याने दुकानदाराला पडलं महागात
राम मंदिराचा विरोध करणाऱ्या इक्बाल अंसारींची मोदींवर फुलांची उधळण
पोलिसांवर हल्ला
नवी मुंबईतील कळंबोली, उरण, उलवे या ठिकाणच्या ट्रकचालकांनी सरकारविरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. रस्ता अपघातात अपघातग्रस्तांना मदत न केल्यास ७ वर्षे शिक्षा आणि १० लाख रूपयांचा दंड हा नवा कायदा सरकारने लागू केला आहे. मात्र या कायद्याविरोधामध्ये ट्रक चालकांनी आंदोलन केलं असून सकाळच्या सत्रामध्ये हे आंदोलन शांत होतं, मात्र त्यावेळी रस्ता रोको करण्यात आला. रास्ता रोकोला विरोध करणाऱ्या पोलिसांवर काही ट्रक चालकांनी मारहण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
काहींनी दगडी,काठ्या घेऊन पोलिसांवर हल्ला चढवला होता. यावेळी पोलिसांनीही आंदोलकांवर लाठीचार्ज करत, काही आंदोलकांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे.