देशामध्ये सध्या राम मंदिरावरून भाजप राजकारण करत असल्याचा दावा विरोधकांकडून होत असल्याची टीका आता काही नेते एकमेकांवर करताना दिसत आहे. याआधी श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गट उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं नाही. यामुळे आयोध्येतील श्रीराम मंदिराला एक राजकीय स्वरूप प्राप्त होऊ लागलं असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता सांगली येथे इस्लामपुरात श्रीरामाच्या मंदिराचे कलश पुजन होते. यासाठी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी राम कोणत्याही एकाच पक्षाचा नाही. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर श्रीराम मंदिरात जयंत पाटील यांच्या शुभहस्ते कलश पुजनाचा सोहळा पार पडला.
‘श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापणा रामनवमीला असायला हवी होती’
सध्या सर्वात महत्त्वाचा गाजत असलेला मोठा मुद्दा म्हणजे आयोध्येतील श्रीरामाचं मंदिर आहे. अनेकदा या मंदिरावरून राजकारण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सांगलीतील इस्लामपुरात रामाच्या मंदिराच्या कलशाची पूजा केली यावेळी ते म्हणाले की, ‘श्री राम हे कोणत्याही एक पक्षाचे नाहीत, ते सर्व पक्षाचे आहेत’. सध्या आयोध्येमध्ये सुरू असलेल्या राम मंदिरावरून जयंत पाटील म्हणाले की, ‘हे आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करत आहेत. प्राणप्रतिष्ठेचा सोहळा रामनवमी दिवशी असता तर आणखी रंगत निर्माण झाली असती’.
हे ही वाचा
ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेक करत पोलिसांवर काठ्यांनी हल्ला
‘देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारीत वाढ’
कपील शर्माला हार्ट अटॅक वाले पराठे खाऊ घातल्याने दुकानदाराला पडलं महागात
‘आयोध्येला जाणार’
‘गर्दी असल्यानंतर मी मंदिरामध्ये जात नाही. गर्दी कमी झाल्यानंतर मी मंदिरामध्ये जाणार असल्याचं जयंत पवार म्हणाले आहेत. लोकं आपल्याला बोलत असतात मात्र लोकाना उत्तर देण्यापेक्षा आपली कामं कोण करणार? असा सवाल आता जयंत पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्राला सुखी करण्यासाठी नवीन वर्षातील माझा संकल्प असल्याचं’, जयंत पाटील म्हणाले आहेत.
‘लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकार आचारसंहिता लागू होण्याआधी मराठा समाजाला सरकार आरक्षण देईल. मात्र ते आरक्षण कोर्टात चालेल की नाही हे माहित नाही. मात्र लोकसभेच्या निवडणुकांआधी आरक्षण दिलं जाईल’, असा तर्क आता जयंत पाटील यांनी लावला आहे.