28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रयशवंतराव होळकरांचे कर्तृत्व शालेय अभ्यासक्रमात सामाविष्ठ करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

यशवंतराव होळकरांचे कर्तृत्व शालेय अभ्यासक्रमात सामाविष्ठ करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

देशाच्या जडणघडणीत होळकर संस्थानचे मोठे योगदान आहे. महाराजा यशवंतराव होळकर (Yashwantrao Holkar ) यांनी इंग्रजांच्या विरोधात तब्बल १८ युद्धे जिंकून भारतीय स्वातंत्र्याचा पाया घातला गेला होता. त्यामुळे यशवंतराव होळकरांचे कर्तृत्व शालेय अभ्यासक्रमात सामाविष्ठ करण्याची मागणी सक्षम लोकविकास फाउंडेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऍड. विजय गोफणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

गोफणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, होळकर संस्थानचे थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सुभेदार तुकोजीराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर इत्यादींनी आपल्या असीम शौर्य व कर्तृत्वाच्या बळावर आदर्शवत व लोकहितकारी राज्यकारभार केला असल्याचे सर्वांनाच माहिती आहे.

प्रचंड देशप्रेम व श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत इंग्रजांना देशाच्या बाहेर हाकलून देणे बी भारत भूमीला इंग्रजांच्या गुलामीतून बाहेर स्वप्न बाळगणारे व त्यासाठी तब्बल ११ वर्ष लढा देणारे महाराजा यशवंतराव होळकर आजच्या पिढीला माहित होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल व महाराष्ट्राला स्वाभिमान देणारं इतिहासातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व मात्र राज्याला अपरिचित राहिल्याने अनेक पिढयांचे नुकसान झाले आहे. म्हणून आमची आपणास मागणी आहे कि शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या कार्याचा समावेश करावा यामधून नव्या पिढीला इतिहासाची माहिती होते व चांगल्या पिढी घडवण्यासाठी प्रेरणा देखील मिळते, असे या गोफणे यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

असा राज्यपाल इतिहासात पाहिला नाही, शरम वाटली पाहिजे… शरद पवार कडाडले

Exclusive: अशोक चव्हाणांचा बाजार रवींद्र चव्हाणांनी उठविला !

इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान पाकिस्तानच्या स्टार खेळाडूची निवृत्ती

या पत्रात मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना म्हटले आहे की, महाराष्ट्रातील तमाम नागरिक नम्रपणे विनंती करतो कि महाराजा यशवंतराव होळकर यांचा वाफगाव येथील किल्ला हे स्मारक म्हणून घोषित करून त्या ठिकाणी विकास निधी देऊन बहूउपयोगी स्मारक विकसित करावे. आम्हाला सर्वांना खात्री आहे कि कृतिशील मुख्यमंत्री व नेतृत्व असल्याने आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समावेश बाबत कार्यवाही कराल व समस्त महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा आदर कराल. सर्व महाराष्ट्राच्या वतीने मी या भावना पत्ररूपाने आपले पर्यंत पोहचवत आहे, असे गोफणे यांनी म्हटले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी