31 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरमंत्रालयExclusive: अशोक चव्हाणांचा बाजार रवींद्र चव्हाणांनी उठविला !

Exclusive: अशोक चव्हाणांचा बाजार रवींद्र चव्हाणांनी उठविला !

रवींद्र चव्हाण यांनी चार – पाच महिन्यांपूर्वी पीडब्ल्यूडी खात्याची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. पण एकाही अधिकाऱ्याला बदलीसाठी थैल्या द्याव्या लागल्या नाहीत.

सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी) हे राज्यातील महत्वाचे मलईदार खाते समजले जाते. हे खाते ज्या मंत्र्यांना मिळते ते दोन्ही हातांनी मलई ओरपण्याचे काम करतात. विजयसिंह मोहिते – पाटील, छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील व अशोक चव्हाण या मातब्बर नेत्यांनी आपल्या खास कर्तबगारीतून या खात्याला वेगळे वलय निर्माण करून दिले होते. या खात्यात मोठी मलई असल्याचा शोध छगन भुजबळ यांनी लावला. भुजबळ यांची ही परंपरा चंद्रकांत पाटील व अशोक चव्हाण यांनीही सुरच ठेवली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात चव्हाण यांच्याकडे हे खाते होते. या अडिच वर्षाच्या काळात पीडब्ल्यूडी खात्याने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली.

अधिकाऱ्यांच्या बदल्या हा मंत्री, आमदार व बगलबच्चे यांच्यासाठी कमी कष्टात व सहजपणे गलेलठ्ठ किंमत मोजून देणारा बाजार आहे. ‘महाविकास आघाडी’ सरकारच्या काळात बदल्यांच्या बाजारात पीडब्ल्यूडी खाते जोरदार फॉर्मात होते. मुंबई व महत्वाच्या ठिकाणच्या पदावरील अधिकाऱ्यांसाठीची किंमत ‘खोक्यां’मध्ये मोजली जात होती.

हे सुद्धा वाचा

PWD : पीडब्ल्यूडीतील बदली घोटाळ्याला रवींद्र चव्हाण यांचा चाप !

अबब! पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी केली ४७ कोटीची बोगस कामे; शिवसेना नगरसेवकाचा गंभीर आरोप!

IAS : अपर मुख्य सचिव भर कौतुक सोहळ्यात अधिकाऱ्यांना म्हणाले, थोडी लाज ठेवा; निर्लज्ज होवू नका

Condition of roads under my department extremely bad: Maharashtra PWD Minister Ravindra Chavan

विशेष म्हणजे, मलईदार पदावर बदली करून घेऊ इच्छिणारे अधिकारी सुद्धा वाट्टेल तेवढी किंमत द्यायला तयार व्हायचे. एका पदासाठी अनेक अधिकारी थैली घेवून मंत्रालयात टाचा घासायचे.

अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळातील हा बाजार रवींद्र चव्हाण यांनी मात्र पूर्णतः संपुष्टात आणला आहे. बदली असो वा कंत्राटे… कुणाचा नवा रूपया सुद्धा घ्यायचा नाही, अशी रोखठोक भूमिका चव्हाण यांनी घेतलेली आहे.

रवींद्र चव्हाण यांनी चार – पाच महिन्यांपूर्वी पीडब्ल्यूडी खात्याची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. पण एकाही अधिकाऱ्याला बदलीसाठी थैल्या द्याव्या लागल्या नाहीत.

‘बदलीसाठी माझ्याकडे यायचेच नाही. ज्या ठिकाणी बदली झाली आहे, त्या ठिकाणी विनातक्रार रूजू व्हा’, अशी सक्त ताकीदच रवींद्र चव्हाण यांनी देवून ठेवली आहे. जाहीर कार्यक्रमांमधून सुद्धा रवींद्र चव्हाण यांनी ‘बदलीसाठी माझ्याकडे येवू नका. नाहीतर कारवाई करेन’ अशा शब्दांत अनेकदा तंबी दिली आहे.

मंत्र्यांच्या स्वच्छ चारित्र्यामुळे अधिकाऱ्यांची पाचावर धारण !

मलईदार पदासाठी सुद्धा रवींद्र चव्हाण अधिकाऱ्यांकडून ‘कट’ घेत नाहीत. त्यामुळे मिळालेल्या पदावर प्रामाणिकपणे, बिनचूक व भ्रष्टाचार न करता काम करण्याची नौबत अधिकाऱ्यांवर आली आहे.

पैसे खाणारा मंत्री असेल तर अधिकाऱ्याने कितीही घाण केली तरी तो निश्चिंत असतो. कारण मंत्र्याला पैसे दिल्यानंतर अधिकाऱ्याने काहीही चुका केल्या तरी मंत्री पाठीशी घालत असतो. परंतु रवींद्र चव्हाण अधिकाऱ्यांचे फाजिल लाड बिल्कूल करीत नाहीत. त्यामुळे आपले काही चुकले तर मंत्री आपल्यावर कारवाईचा दंडूका उगारतील, याची भिती अधिकाऱ्यांमध्ये पसरल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!