33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी; शिंदे गटाकडून ठाकरेंच्या राजीनाम्यावरच वेधले लक्ष

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी; शिंदे गटाकडून ठाकरेंच्या राजीनाम्यावरच वेधले लक्ष

सर्वोच्च न्यायालयात गेले दोन दिवस महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी पार पडली. बुधवारी (दि.१) मार्च रोजी शिंदे गटाचे वकील निरज किशन कौल यांनी युक्तीवाद केला. तर आज हरीश साळवे यांनी देखील सुनावणीत ऑनलाईन उपस्थित राहत शिंदे गटाची बाजू मांडली. आज सत्तासंघर्षाची सुनावणी संपणार अशी अटकळ होती मात्र, सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने सर्वौच्च न्यायालयाने आता होळीच्या सुट्टीनंतर सुनावणी घेणाऱ असल्याचे सांगितले. आजच्या सुनावणीत शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तीवाद करताना, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार कोसळल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नसल्याचा युक्तीवाद देखील त्यांनी यावेळी जोरदारपणे मांडला. वेळे अभावी आज सुनावणी पूर्ण होऊ न शकल्यामुळे आता 14 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. (Uddhav Thackeray’s resignation while arguing from the Shinde faction in the Supreme Court drew attention)

आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्यावतीने हरीश साळवे यांनी युक्तीवाद करताना उद्धव ठाकरे हे बहूमत चाचणीला सामोरे गेले नाहीत, ते बहूमत चाचणीला सामोरे गेले असते तर त्यांच्या आघाडीतील एखाद्या पक्षाने देखील त्यांची साथ सोडली असती असे सांगतानाच बहूमत चाचणीत काहीही होऊ शकले असते असा दावा त्यांनी केला. यावेळी साळवे यांनी राज्यपालांच्या भूमिकेचे देखील समर्थन केले. राज्यपालांनी ठाकरेंना बहूमतचाचणीला बोलावले, मात्र त्यांनी राजीनामा दिल्याने राज्यपालांनी शिंदे यांना निमंत्रण दिले. शिंदे यांनी बहूमतचाचणीत बहूमत सिद्ध केल्याचे हरीश साळवे यावेळी म्हणाले.
हे सुद्धा वाचा :
2023 पासूनच MPSC परीक्षा नवीन पॅटर्ननुसार : राज्य लोकसेवा आयोगाचे ट्विट आणि मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील उत्तरात विसंगती!
अजितदादा, निवडणूक आयोग नाही, MPSC बोललो बरं का – मुख्यमंत्री
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा राडा; कांदा-लसणाच्या माळा घालून केलं आंदोलन

सर्वौच्च न्यायालयात आज संपूर्ण सुनावणी पार पडेल असा अंदाज होता मात्र शिंदे गटाकडून आज युक्तीवाद पूर्ण होऊ शकला नाही. आज साधारण दोन तास सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला मात्र वेळेअभावी संपूर्ण युक्तीवाद न झाल्यामुळे ही सुनावणी आता १४ मार्च रोजी होणार आहे. आता शिंदे गटाकडून युक्तीवाद पुर्ण झाल्यानंतर त्यावर ठाकरे गट देखील त्यावर आपला प्रतिवाद करेल. दरम्यान ही सुनावणी लवकरच संपवण्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष असल्याने आता पुढच्या सुनावणीत दोन्ही गटाचे युक्तीवाद झाल्यानंतर लवकरच सर्वोच्च न्यायालय देखील निकाल जाहीर करेल असा अंदाज आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी