35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रईदच्या पार्श्वभूमीवर समाज विघातक व्यक्तींवर करडी नजर ठेवा, वंचित बहुजन आघाडीचे आवाहन

ईदच्या पार्श्वभूमीवर समाज विघातक व्यक्तींवर करडी नजर ठेवा, वंचित बहुजन आघाडीचे आवाहन

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकारने विचार विनिमय करण्यासाठी (Vanchit Bahujan Aaghadi) आज सर्व पक्षीय बैठक बोलावून सुचना व उपाय योजना मागविल्यात त्याबद्दल सरकारचे स्वागत आहे. सध्यस्थितीत महाराष्ट्रातील वस्त्यांमध्ये भितीदायक व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे (Vanchit Bahujan Aaghadi appeals to the state government)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा आणि भडकावू भाषणांमधून वातावरण बिघडवत आहे. परंतू देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या भाषणातून समोर आलेली गंभीर गोष्ट ही आहे की ते म्हणाले की, ‘त्यांना काही पोलीस वाले कानात सांगत आहेत की काही मशिदीत व मदरशात समाज विघातक कामे चालू आहेत.’ असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

वंचितचे (Vanchit Bahujan Aaghadi)  ग्राऊंड वरील कार्यकर्ते म्हणाले, जनता शांत आहे परंतू राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची हालचाल लक्षात येण्या इतकी वाढलेली आहे. परिस्थिती चिघळू द्यायची नसेल तर या कार्यकर्त्यांवर करडी नजर ठेवली पाहीजे. गरज वाटल्यास काही संशयित लोकांना ताब्यात घेतले पाहिजे. याच परिस्थितीमुळे मुस्लिम समाजामधील काही कट्टर कार्यकर्ते याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आढळले तर या सेक्शन वर सुध्दा लक्ष ठेवून उर्वरित मुस्लीम समाजाला सुरक्षिततेच्या बाबतीत सरकारने आश्वस्त केले पाहिजे.

तर मग आमची अशी मागणी आहे की सरकारने याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन झाडाझडती घेतली पाहीजे व यात काही तथ्य आढळून आल्यास कडक कारवाई पण केली पाहीजे. आणि जर यात काही सापडले नाही तर याचा अर्थ राज ठाकरे दोन समाजात तेढ वाढवण्यासाठी संदेह पसरवून भडकावू भाषणे करत आहेत. आपल्या वक्तव्याने हिंदु समाजात गैरसमजातुन भय व दहशत पसरवत आहेत हे स्पष्ट होते हीच समाज विघातक कृती आहे. शांतता व सुव्यवस्थेला सुरुंग लावत आहेत. हे (Vanchit Bahujan Aaghadi)लक्षात घेऊन त्यांच्यावर UAPA कायद्या अंतर्गत कारवाई केली पाहीजे.

महाराष्ट्रात आजपर्यंत ज्या दंगली झाल्यात त्यामध्ये ज्या संघटना व व्यक्तीचा सहभाग आढळून आला त्या संघटना व व्यक्तीचा वेळीच बंदोबस्त करावा. राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी वरील सुचना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सर्व पक्षीय बैठकीत (Vanchit Bahujan Aaghadi)  महाराष्ट्र सरकारला केल्या आहेत. सदर बैठकीस मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान, सरचिटणीस आनंद जाधव यावेळी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :- 

New Phase in Dalit Politics: Crisis or Regeneration?

‘रावसाहेब दानवे हे राज ठाकरे यांचे प्रवक्ते केव्हापासून झाले’ : महेश तपासे

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी