35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमुंबईवक्तव्यामध्ये काहीही तथ्य आढळून न आल्यास, राज ठाकरेंना बेड्या ठोका : रेखा...

वक्तव्यामध्ये काहीही तथ्य आढळून न आल्यास, राज ठाकरेंना बेड्या ठोका : रेखा ठाकूर

टीम लय भारी 

मुंबई:  शिवाजी पार्क येथील गुढीपाडव्या निमित्त झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मशीदींमध्ये समाज विघातक गोष्टी घडत आहेत असा अतिशय गंभीर आरोप केलेला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी राज ठाकरे यांचे स्त्रोत तपासून ज्या मशिदीत अथवा मदरशांमध्ये समाजविघातक कृत्य घडत आहेत तेथे कसुन चौकशी करावी व काही तथ्य आढळल्यास मशिदी सील करुन जबाबदार मशिद व मदरसा समितीवर कडक कायदेशीर कारवाई करावी.(Bahujan Vanchit Aaghadi)

मात्र, जर या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य आढळून आले नाही तर समाजामध्ये दहशत व विद्वेष पसरविण्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर यु.ए.पी.ए अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांनी बेड्या ठोका, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या (Bahujan Vanchit Aaghadi)  प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केली आहे.

सुजात आंबेडकरांनी केलेली टिका

राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरचे अनधिकृत भोंगे हटवण्याची मागणी केली. जर भोंगे हटवले नाहीत, तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्याची कार्यकर्त्यांना सूचना केली. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी कडाडून प्रहार केला. पहिल्यांदा अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा. आमचा एकही बहुजन (Bahujan Vanchit Aaghadi)  पोरगा नकोय तिकडे, असं म्हणत राज ठाकरे यांच्या भूमिकेवर सुजात आंबेडकर यांनी सडकून टीका केली. तसंच तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लिम दंगलीवर उभा करु नका, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी राज ठाकरेंना केला.

हे सुध्दा वाचा : 

Hijab Row: Muskan Khan’s Felicitation Denied By Police, Vanchit Bahujan Aghadi Moves HC

‘पैगंबर बिल’ या सारखे भविष्यात येणारे कायदे धार्मिक राजकारण खोदून काढतील : प्रकाश आंबेडकर 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी