27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रवडगाव मावळ सहायक निबंधक कार्यालयाला मिळेना अधिकारी; सर्वसामान्य नागिरकांच्या कामांचा खोळंबा

वडगाव मावळ सहायक निबंधक कार्यालयाला मिळेना अधिकारी; सर्वसामान्य नागिरकांच्या कामांचा खोळंबा

वडगाव मावळ सहायक निबंधक कार्यालयातील सहायक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांचे निलंबन झाल्यानंतर तेथील सहायक निबंधकपदी अद्यापही कोणाची नियुक्ती न झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली आहेत. सहायक निबंधक कार्यलयात दररोज असंख्य नागरिक आपल्या समस्या तक्रारी घेऊन येत असतात मात्र अधिकारीच नसल्यामुळे त्यांचे वारंवार हेलपाटे होत आहेत. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडेच आपले गाऱ्हाण मांडले असून याप्रश्नाकडे त्यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.

वडगाव मावळ सहायक निबंधक कार्यालयातील सहायक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांचे निलंबन झाल्यानंतर तेथील सहायक निबंधकपदी अद्यापही कोणाची नियुक्ती न झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली आहेत. सहायक निबंधक कार्यलयात दररोज असंख्य नागरिक आपल्या समस्या तक्रारी घेऊन येत असतात मात्र अधिकारीच नसल्यामुळे त्यांचे वारंवार हेलपाटे होत आहेत. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडेच आपले गाऱ्हाण मांडले असून याप्रश्नाकडे त्यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.

वडगाव सहायक निबंधक कार्यालयातील सहायक निबंधकाचे पद रिकामे असल्यामुळे सध्या येथे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अधिकारीच नसल्याने गऱ्हाण तरी कुणाकडे मांडायचे असा सवाल येथे येणारे नागरिक करत आहेत. वडगाव परिसरातील सोयायट्यांच्या तक्रारींसदर्भात देखील सहायक निबंधक कार्यालयाकडून नागरिकांचे कोणतेही समाधान होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांचेच लक्ष वेधले आहे.

प्रदीप नाईक म्हणाले, मावळ तालुक्यातील सहायक निबंधक कार्यलयात आजपर्यंत ज्या घटना घडलेल्या आहेत त्या संपूर्ण तालुक्याला माहिती आहेत राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून भ्रष्टाचारी अधिकारी सुर्यवंशी यांचे निलंबन झाले. पण त्यानंतर अद्याप देखील सहायक निबंधक कार्यलयातील खुर्च्या रिकाम्याच आहेत. त्यामुळे जनतेचे हाल होत आहे. असे सांगतानाच नाईक म्हणाले की, गेले आठवडाभर मी या कार्यालयात सोसायटीच्या काही तक्रारी करण्यासाठी येत आहे, मात्र येथील एक प्रशासकीय अधिकारी प्रभारी घुले यांची भेट झालेली नाही.
हे सुद्धा वाचा
बांधकाम व्यावसायिक अजय आशर, माजी आमदार डॉ. राजेश क्षिरसागर यांची ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याने महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ, अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना व प्रभावी अंमलबजावणीची गरज : प्रा. डॉ. मनीषा कायंदे
बाबासाहेब पुरंदरेंची मांडणी विकृत व अनहैतासिक, इतिहासकार जयसिंगराव पवार यांचे स्पष्टीकरण
नाईक म्हणाले, कार्यालयात घुले यांची भेट न झाल्यामुळे झाल्यामुळे आम्ही मिलींद सोबळे या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रारी केल्या. त्यानंतर त्यांनी आठवडाभरात तक्रारींचे निराकरण करु असे सांगितले. मात्र वडगाव सहायक निबंधक कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की आपण तालुक्यातील या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करुन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी प्रदीप नाईक यांनी केलेली आहे.

सध्या सहायक निबंधक अधिकारी पद रिक्त असल्याने कार्यालयाला कसलीच शिस्त राहीली नाही. अधिकाऱ्यांकडे तक्रारी घेऊन जायचे म्हटले तर अधिकाऱ्यांच्या भेटी देखील होत नाहीत. नागिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरणे गरजेचे असून जे अधिकारी येथे सध्या आहेत त्यांनी देखील लोकांच्या समस्या ऐकुन घेण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी कार्यालयात उपस्थित असणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी