35 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रVIDEO: आणखी ८ दिवस गारठा वाढणार

VIDEO: आणखी ८ दिवस गारठा वाढणार

राज्यात थंडीची लाट आणखी ८ दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्याचा पारा 15 अंशाच्या खाली आल्याने अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. तर आणखी ८ दिवस ही थंडीची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात थंडीची लाट आणखी ८ दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्याचा पारा 15 अंशाच्या खाली आल्याने अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. तर आणखी ८ दिवस ही थंडीची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्यातही थंडीचा जोर कायम असून मागच्या चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि तसेच कोकणात थंडी वाढली आहे. विदर्भ व उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत तसेच परभणी, गोंदिया, अकोला, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतही थंडीचा कडका कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश शहरांत सकाळी दाट धुके पडणार आहे. तसेच पुढील सरासरी आठ दिवस थंडीची लाट कायम राहील तर मागील चार दिवसांपासून राज्यात जळगाव शहराचे तापमान नीचांकी नोंदले असून 5 अंशांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे वाढती थंडी काही पिकांसाठी फायदेशीर ठरणार असून गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी पोषक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे.

 

हे सुद्धा पहा : Weather Change Effects : बदलत्या हवामानात निरोगी राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचे नियमित पालन करा 

                 राहुल गांधींना थंडी का वाजत नाही? 

                पुढील काही दिवस ‘या’ राज्यांमध्ये थंडीची लाट कायम

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी