25 C
Mumbai
Wednesday, March 22, 2023
घरमुंबईप्रवाशांसाठी खुशखबर! एकाच कार्डवर करा मोनो, मेट्रो, रेल्वे आणि बसमधून प्रवास

प्रवाशांसाठी खुशखबर! एकाच कार्डवर करा मोनो, मेट्रो, रेल्वे आणि बसमधून प्रवास

मुंबईकरांना एकाच तिकिटावर आता अनेक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ उठवता येणार आहे. तसेच भविष्यात या कार्डच्या माध्यमातून मुंबईतच प्रवास करता येणार आहे असे नाही, तर देशभरातील कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी हे कार्ड वापरता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.

एका ठिकाणाहून शहराच्या विविध भागांत प्रवास करताना अनेक प्रवाशांना कित्येकदा रेल्वे, मोनो, बसमधून उलटसुलट प्रवास करावा लागतो. यावेळी प्रत्येकवेळा वेगवेगळे तिकीट काढावे लागत असल्यामुळे प्रवासासाठी अधिक वेळ लागतो. पण आता मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बसमधून एकाच तिकिटावर प्रवास करणे शक्य होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) एकात्मिक तिकीट प्रणाली (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) विकसित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजीपासून ही सुविधा सुरु होणार आहे. सध्या ही सुविधा ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डीएन नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर ते गुंदवली, अंधेरी पूर्व) मार्गिकेसाठी लागू होणार आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ‘मोबाईल १’ या अँपचेही प्रसारण करण्यात येणार आहे. ‘मेट्रो’च्या सेवेबद्दलची सर्व माहिती प्रवाशांना या अँपवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा त्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ‘एमएमआरडीए’कडून प्रयत्न केले जात होते. या उपाययोजनेचा भाग म्हणूनच एकात्मिक तिकीट प्रणालीची चाचपणी सुरु होती. या कार्डची सुरुवात १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

चंद्रकांत दादा म्हणतात, एकही देव ‘बॅचलर’ नाही; मारुतीराया सविस्तर चर्चेसाठी भेट घेणार!

लालू प्रसाद यादव यांच्यावर रेल्वे भरती घोटाळा प्रकरणी खटला चालविण्यास गृहमंत्रालयाची परवानगी

इस्लाम बदलणार की नाही? राखी सावंत धर्म बदलून फातिमा झाल्यानंतर तस्लीमा नसरीन यांचा संतप्त सवाल

या सुविधेमुळे प्रवाशांना आता एकाच कार्डद्वारे मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बसमधून प्रवास करता येणार आहे. इतकेच नाही तर, देशभरातील कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी हे कार्ड वापरता येणार आहे. याबाबतची चाचणी सुरु असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’ने दिली आहे.

अशी आहे सुविधा…

  • १०० रुपयांत हे कार्ड रिचार्ज करता येणार असून कार्डधारकाला २००० रूपांपर्यंत या कार्डमध्ये आगाऊ रक्कम जमा करता येईल.
  • यासाठी केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाशीच करार करण्यात आला आहे.
  • भविष्यात या कार्डद्वारे कार्डधारकांना शॉपिंगही करता येणार आहे.
  • टोल नाक्यांवर टोल भरता येणार आहे.
  • पैसे काढण्यासाठीही या कार्डचा वापर करता येणार आहे.
    .

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी