36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रPune Crime News: मुल होत नव्हते म्हणून मांत्रिकाला बोलावले; पती, सासूवर गुन्हा...

Pune Crime News: मुल होत नव्हते म्हणून मांत्रिकाला बोलावले; पती, सासूवर गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी ३६ वर्षीय पतीला अटक केली असून ५५ वर्षीय सासूवर अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारी नुसार तिचा पती, सासु, सासरा तिला लग्न झाल्यापासूनच त्रास देत होते. लग्नात पतीने हुंड्यात अलिशान कारची मागणी केली होता. दरम्यानच्या काळात पीडित महिलेला मूल होत नसल्याने तिला एका मांत्रिकाकडे घेऊन जात मांत्रिकाने दिलेले लिंबू जबरदस्ती खाऊ घातले.

मुल होत नसल्याने महिलेला मांत्रिकाकडे घेऊन जात तिच्यावर तंत्रविद्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला अटक केली आहे. तर फरार मांत्रिकाचा शोध पोलीस घेत आहेत.

महिलेला मुल होत नसल्याने तिचा पती आणि सासुने तिला मांत्रिकाकडे नेले आणि तिच्यावर तंत्रविद्या केली. याबाबत पीडितेने आपल्या आई-वडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी ३६ वर्षीय पतीला अटक केली असून ५५ वर्षीय सासूवर अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारी नुसार  तिचा पती, सासु, सासरा तिला लग्न झाल्यापासूनच त्रास देत होते. लग्नात पतीने हुंड्यात अलिशान कारची मागणी केली होता. दरम्यानच्या काळात पीडित महिलेला मूल होत नसल्याने तिला एका मांत्रिकाकडे घेऊन जात मांत्रिकाने दिलेले लिंबू जबरदस्ती खाऊ घातले.

लग्नात मागितली अलिशान कार –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, हुंड्यात अलिशान कार न मिळाल्यामुळे सासरकडचे लोक तिला छळत होते. तसेच पीडित महिलेला मुल होत नसल्यामुळे तिला त्रास देत होते. पीडित महिलेने वैद्यकीय उपचारासाठी सासरकडच्या लोकांकडे मागणी केली, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एका मांत्रिकाला बोलावून काळी जादू करण्यास सांगितले. त्यानंतर पीडित महिलेने आपल्या आई-वडिलांना फोन करुन सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेले.

हे सुद्धा वाचा –

Healthcare Facility: राज्यात ७०० ठीकाणी सुरू होणार ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’!

Mumbai News : रेल्वे प्रवाशाच्या बॅगेत सापडला तब्बल 2 कोटींचा मुद्देमाल! रक्कम बघून आरपीएफही दंग

Hrithik Roshan Video : गरबा क्विन फाल्गुनी पाठकसोबत हृतिकचा शानदार गरबा पाहिलात का?

शौचालयात ठेवले कोंडून –

पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, तिच्या पतीने तिला मारहाण केली आणि दोन दिवस शौचालयात कोंडून ठेवलेय सुरूवातीला पीडितेने आपल्या वडिलांना याबाबत काही सांगितले नाही, त्याचा फायदा उठवत पीडितेच्या पतीने वारंवार तीचा छळ केला. इतकेच नाही तर तीचा पती तिला घराबाहेर देखील जाऊ देत नव्हता. शेवटी या छळाला कंटाळून पीडितेने आपल्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली.

 मांत्रिकाचा शोध सुरू –

या प्रकरणी फरार मांत्रिकाचा पोलीस शोध घेत आहेत. पीडित महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी